S M L

घोटाळ्याचा आरोप असलेल्या शिर्केंकडे श्वेतपत्रिकेचं काम

13 ऑक्टोबरविदर्भ पाटबांधारे विकास महामंडळाच्या सिंचन प्रकल्पांमध्ये झालेल्या कथित घोटाळ्याला मुख्यत: जबाबदार असलेले महामंडळाचे तत्कालिन कार्यकारी संचालक डी.पी.शिर्के यांच्यामार्फतच सिंचनाची श्वेतपत्रिका तयार करण्याचं काम सुरू झालंय. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यातच डी.पी.शिर्के यांच्यासह 45 अधिकार्‍यांच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत. त्यामुळे घोटाळ्यात अडकलेले डी.पी.शर्के सिंचन श्वेतपत्रिका तयार करण्याचं काम कसं करू शकतात असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारलाय. तसंच डी.पी.शिर्के यांना तातडीनं त्यांच्या पदावरून हटवण्याची मागणीसुध्दा तावडे यांनी केली आहे. सध्या शिर्के जलसंपदा खात्याचे लाभक्षेत्र कक्षाचे सचिव म्हणून काम करतायत. शिर्के आणि खात्याचे प्रधान सचिव एकनाथ पाटील या दोघांवर सिंचनपत्रिका तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कोण आहेत डी. पी. शिर्के ? - डी.पी.शिर्के सध्या जलसंपदा खात्याचे सचिव ( लाभक्षेत्र) - विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे तत्कालिन कार्यकारी संचालक असताना डी.पी.शिर्के यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप- नंदकुमार वडनेरे समितीच्या चौकशीत डी.पी.शिर्के दोषी- जून ते ऑगस्ट -2009 दरम्यान महामंडळाच्या 32 प्रकल्पांच्या कामांना बेकायदेशीर मान्यता दिली. - अजित पवार आणि डी.पी.शिर्के यांनी आपल्या सह्यांनीशी सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली. - महामंडळाच्या गर्व्हनिंग कौन्सिलला विश्वासात न घेता अजित पवार आणि डी.पी.शिर्के यांनी कामांना मान्यता दिली. - निम्न पैनगंगासह अनेक प्रकल्पांच्या कामांच्या निविदा अजित पवार आणि डी.पी.शिर्के यांनी काढल्या- काही निविदा प्रशासकीय मान्यतेपूर्वीच जारी केल्या- 6 सप्टेंबर 2012ला डी.पी.शिर्के यांच्यासह 45 अधिकार्‍यांच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 13, 2012 09:46 AM IST

घोटाळ्याचा आरोप असलेल्या शिर्केंकडे श्वेतपत्रिकेचं काम

13 ऑक्टोबर

विदर्भ पाटबांधारे विकास महामंडळाच्या सिंचन प्रकल्पांमध्ये झालेल्या कथित घोटाळ्याला मुख्यत: जबाबदार असलेले महामंडळाचे तत्कालिन कार्यकारी संचालक डी.पी.शिर्के यांच्यामार्फतच सिंचनाची श्वेतपत्रिका तयार करण्याचं काम सुरू झालंय. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यातच डी.पी.शिर्के यांच्यासह 45 अधिकार्‍यांच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत. त्यामुळे घोटाळ्यात अडकलेले डी.पी.शर्के सिंचन श्वेतपत्रिका तयार करण्याचं काम कसं करू शकतात असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारलाय. तसंच डी.पी.शिर्के यांना तातडीनं त्यांच्या पदावरून हटवण्याची मागणीसुध्दा तावडे यांनी केली आहे. सध्या शिर्के जलसंपदा खात्याचे लाभक्षेत्र कक्षाचे सचिव म्हणून काम करतायत. शिर्के आणि खात्याचे प्रधान सचिव एकनाथ पाटील या दोघांवर सिंचनपत्रिका तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

कोण आहेत डी. पी. शिर्के ?

- डी.पी.शिर्के सध्या जलसंपदा खात्याचे सचिव ( लाभक्षेत्र) - विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे तत्कालिन कार्यकारी संचालक असताना डी.पी.शिर्के यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप- नंदकुमार वडनेरे समितीच्या चौकशीत डी.पी.शिर्के दोषी- जून ते ऑगस्ट -2009 दरम्यान महामंडळाच्या 32 प्रकल्पांच्या कामांना बेकायदेशीर मान्यता दिली. - अजित पवार आणि डी.पी.शिर्के यांनी आपल्या सह्यांनीशी सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली. - महामंडळाच्या गर्व्हनिंग कौन्सिलला विश्वासात न घेता अजित पवार आणि डी.पी.शिर्के यांनी कामांना मान्यता दिली. - निम्न पैनगंगासह अनेक प्रकल्पांच्या कामांच्या निविदा अजित पवार आणि डी.पी.शिर्के यांनी काढल्या- काही निविदा प्रशासकीय मान्यतेपूर्वीच जारी केल्या- 6 सप्टेंबर 2012ला डी.पी.शिर्के यांच्यासह 45 अधिकार्‍यांच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 13, 2012 09:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close