S M L

भुजबळांचा 'सिक्रेट' प्रकल्प ?

11 ऑक्टोबरसार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे कुटुंबीय पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे. नवी मुंबईत 100 एकर जमिनीवर भुजबळ कुटुंबीयांच्या एका प्रकल्पाचं संशयास्पद बांधकाम करण्यात आल्याचं समोर आलं आहे. हा प्रकल्प खारघरच्या सेक्टर 36 मध्ये सुरू असून पुतण्या समीर भुजबळ आणि मुलगा पंकज भुजबळ संचालक असलेल्या देविशा कंपनीचं हे बांधकाम 'हेक्स वर्ल्ड प्रोजेक्‍ट' या नावाने सुरू आहे. विशेष म्हणजे शिवयश आणि ब्लू सर्कल इन्फ्राटेक कंपन्यांनी भुजबळांच्या कंपन्यांत अर्ध्या तासात 38 कोटी रुपये जमीन खरेदीचा मोबदला म्हणून हेच पैसे त्याच कंपनीला परत केले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे 'हेक्स प्रोजेक्‍ट'च्या कंपाउंडमध्येच महागडे विदेशी घोड्यांचं बस्तान आहे. हे घोडे कोणाचे आहे ? कुठून आले आहे ? याबद्दल कमालाची गुप्तता बाळगण्यात येत आहे. आयबीएन लोकमतची टीम जेंव्हा तिथे पोहचली तर सुरक्षारक्षकांनी उडावा-उडवीची उत्तर देऊन टीमला बाहेर काढलं. खुद्द छगन भुजबळ यांनी हे घोडे माझे नाही ते तुम्हीच घेऊन जा असं त्रागानं उत्तर दिलं. तुम्हाला विचारपुस करायची असेल तर समीरशी बोला असं उत्तर देऊन अंग काढण्याचा प्रयत्न केला. पण या सर्व व्यवहाराचे कागदपत्रं आयबीएन लोकमतच्या हाती लागली आहे. याचे उत्तर भुजबळांना द्यावेच लागणार. छगन भुजबळ यांच्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले. छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज आणि पुतण्या समीर भुजबळ यांच्या मुलांच्या कंपन्यांमध्ये झालेले व्यवहार संशयास्पद असल्याचा दावा त्यांनी पुराव्यानिशी केला. भुजबळ आणि कंपनी- शिवयश डेव्हलपर्स- ब्लू सर्कल इन्फ्रास्ट्रक्चर- 14 फेब्रुवारी, 2007- 5.48 कोटी रु.- पंकज आणि समीरची कंपनी- परवेश कन्स्ट्रक्शन- शिवयश डेव्हलपर्स- ब्लू सर्कल इन्फ्रास्ट्रक्चर- 23 एप्रिल, 2010 - 29 कोटी रु.- पंकज आणि समीरची कंपनी- परवेश कन्स्ट्रक्शन- परवेश कन्स्ट्रक्शन- पंकज आणि समीरची कंपनी- 23 एप्रिल, 2010- 34 कोटी 48 लाख रु. जमा- परवेश कन्स्ट्रक्शन- 23 एप्रिल, 2010 - 34.48 कोटी रु.- पंकज फोटो, समीर फोटो- देविशा इन्फ्रास्ट्रक्चर- देविशा इन्फ्रास्ट्रक्चर- 23 एप्रिल, 2010 - 34.48 कोटी रु.- शिवयश डेव्हलपर्स- ब्लू सर्कल इन्फ्रास्ट्रक्चर

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 11, 2012 04:59 PM IST

भुजबळांचा 'सिक्रेट' प्रकल्प ?

11 ऑक्टोबर

सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे कुटुंबीय पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे. नवी मुंबईत 100 एकर जमिनीवर भुजबळ कुटुंबीयांच्या एका प्रकल्पाचं संशयास्पद बांधकाम करण्यात आल्याचं समोर आलं आहे. हा प्रकल्प खारघरच्या सेक्टर 36 मध्ये सुरू असून पुतण्या समीर भुजबळ आणि मुलगा पंकज भुजबळ संचालक असलेल्या देविशा कंपनीचं हे बांधकाम 'हेक्स वर्ल्ड प्रोजेक्‍ट' या नावाने सुरू आहे. विशेष म्हणजे शिवयश आणि ब्लू सर्कल इन्फ्राटेक कंपन्यांनी भुजबळांच्या कंपन्यांत अर्ध्या तासात 38 कोटी रुपये जमीन खरेदीचा मोबदला म्हणून हेच पैसे त्याच कंपनीला परत केले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे 'हेक्स प्रोजेक्‍ट'च्या कंपाउंडमध्येच महागडे विदेशी घोड्यांचं बस्तान आहे. हे घोडे कोणाचे आहे ? कुठून आले आहे ? याबद्दल कमालाची गुप्तता बाळगण्यात येत आहे. आयबीएन लोकमतची टीम जेंव्हा तिथे पोहचली तर सुरक्षारक्षकांनी उडावा-उडवीची उत्तर देऊन टीमला बाहेर काढलं. खुद्द छगन भुजबळ यांनी हे घोडे माझे नाही ते तुम्हीच घेऊन जा असं त्रागानं उत्तर दिलं. तुम्हाला विचारपुस करायची असेल तर समीरशी बोला असं उत्तर देऊन अंग काढण्याचा प्रयत्न केला. पण या सर्व व्यवहाराचे कागदपत्रं आयबीएन लोकमतच्या हाती लागली आहे. याचे उत्तर भुजबळांना द्यावेच लागणार. छगन भुजबळ यांच्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले. छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज आणि पुतण्या समीर भुजबळ यांच्या मुलांच्या कंपन्यांमध्ये झालेले व्यवहार संशयास्पद असल्याचा दावा त्यांनी पुराव्यानिशी केला.

भुजबळ आणि कंपनी

- शिवयश डेव्हलपर्स- ब्लू सर्कल इन्फ्रास्ट्रक्चर- 14 फेब्रुवारी, 2007- 5.48 कोटी रु.- पंकज आणि समीरची कंपनी- परवेश कन्स्ट्रक्शन

- शिवयश डेव्हलपर्स- ब्लू सर्कल इन्फ्रास्ट्रक्चर- 23 एप्रिल, 2010 - 29 कोटी रु.

- पंकज आणि समीरची कंपनी- परवेश कन्स्ट्रक्शन- परवेश कन्स्ट्रक्शन- पंकज आणि समीरची कंपनी- 23 एप्रिल, 2010- 34 कोटी 48 लाख रु. जमा

- परवेश कन्स्ट्रक्शन- 23 एप्रिल, 2010 - 34.48 कोटी रु.- पंकज फोटो, समीर फोटो- देविशा इन्फ्रास्ट्रक्चर

- देविशा इन्फ्रास्ट्रक्चर- 23 एप्रिल, 2010 - 34.48 कोटी रु.- शिवयश डेव्हलपर्स- ब्लू सर्कल इन्फ्रास्ट्रक्चर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 11, 2012 04:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close