S M L

त्रिवेदींवरचा देशद्रोहाचा खटला मागे

12 ऑक्टोबरवादग्रस्त व्यंगचित्रकार असीम त्रिवेदींवरचा देशद्रोहाचा खटला अखेर सरकारने मागे घेतला आहे. महाराष्ट्राचे ऍटर्नी जनरल यांनी हायकोर्टाला ही माहिती िदली. असीम त्रिवेदीने संसद आणि भारताचे मानचिन्ह अशोक स्तंभाचे वादग्रस्त व्यंगचित्र काढले होते. या व्यंगचित्रात संसदेला शौचालय दाखवले होते तर अशोक स्तंभाच्या सिंहांच्या जागी लांडग्याचे व्यंगचित्र रेखाटून सत्यमेव जयते च्या जागी 'भ्रष्टमेव जयते' असा उल्लेख केला होता. असीमच्या व्यंगचित्रावर आक्षेप घेत सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी असीमवर सरकारनं देशद्रोहाचा खटला दाखल करुन अटक करण्यात आली होती. असीमच्या अटकेचे बातमी वार्‍यासारखी पसरली आणि इंडीया अगेन्स्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल आणि कार्यकर्त्यांनी याविरोधात आंदोलनं केल्यानंतर असीमाला जामीनावर सोडावे लागले. आणि आज राज्यसरकारनं असीमवरचा देशद्रोहाचा खटला मागे घेतला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 12, 2012 09:40 AM IST

त्रिवेदींवरचा देशद्रोहाचा खटला मागे

12 ऑक्टोबर

वादग्रस्त व्यंगचित्रकार असीम त्रिवेदींवरचा देशद्रोहाचा खटला अखेर सरकारने मागे घेतला आहे. महाराष्ट्राचे ऍटर्नी जनरल यांनी हायकोर्टाला ही माहिती िदली. असीम त्रिवेदीने संसद आणि भारताचे मानचिन्ह अशोक स्तंभाचे वादग्रस्त व्यंगचित्र काढले होते. या व्यंगचित्रात संसदेला शौचालय दाखवले होते तर अशोक स्तंभाच्या सिंहांच्या जागी लांडग्याचे व्यंगचित्र रेखाटून सत्यमेव जयते च्या जागी 'भ्रष्टमेव जयते' असा उल्लेख केला होता. असीमच्या व्यंगचित्रावर आक्षेप घेत सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी असीमवर सरकारनं देशद्रोहाचा खटला दाखल करुन अटक करण्यात आली होती. असीमच्या अटकेचे बातमी वार्‍यासारखी पसरली आणि इंडीया अगेन्स्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल आणि कार्यकर्त्यांनी याविरोधात आंदोलनं केल्यानंतर असीमाला जामीनावर सोडावे लागले. आणि आज राज्यसरकारनं असीमवरचा देशद्रोहाचा खटला मागे घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 12, 2012 09:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close