S M L

सुनील तटकरेंचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर

13 ऑक्टोबरभाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई हायकोर्टात सुनील तटकरे आणि कुटुंबीयांविरोधात सादर केलेल्या याचिकेप्रकरणी सुनील तटकरे यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलंय. किरीट सोमय्या यांनी सादर केलेली याचिका दाखल करुन घेऊ नये असंही त्यांनी या प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून म्हटलंय. ही याचिका जनहितार्थ नसून केवळ राजकीय वैमनस्यातून करण्यात आल्याचंही त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. तटकरे यांचे सहकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कंपन्यांचे व्यवहार याची चौकशी करण्याची मागणी सोमय्या यांनी केली. सोमय्या यांची ही याचिका दाखल करायची की नाही याबद्दल मुंबई हायकोर्ट पुढील सुनावणीत निर्णय देणार आहे. याचप्रकरणात महाराष्ट्र सरकारलाही प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. मात्र,अजून राज्य सरकारने याप्रकरणात प्रतिज्ञापत्र दिलेलं नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 13, 2012 03:49 PM IST

सुनील तटकरेंचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर

13 ऑक्टोबर

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई हायकोर्टात सुनील तटकरे आणि कुटुंबीयांविरोधात सादर केलेल्या याचिकेप्रकरणी सुनील तटकरे यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलंय. किरीट सोमय्या यांनी सादर केलेली याचिका दाखल करुन घेऊ नये असंही त्यांनी या प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून म्हटलंय. ही याचिका जनहितार्थ नसून केवळ राजकीय वैमनस्यातून करण्यात आल्याचंही त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. तटकरे यांचे सहकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कंपन्यांचे व्यवहार याची चौकशी करण्याची मागणी सोमय्या यांनी केली. सोमय्या यांची ही याचिका दाखल करायची की नाही याबद्दल मुंबई हायकोर्ट पुढील सुनावणीत निर्णय देणार आहे. याचप्रकरणात महाराष्ट्र सरकारलाही प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. मात्र,अजून राज्य सरकारने याप्रकरणात प्रतिज्ञापत्र दिलेलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 13, 2012 03:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close