S M L

अजून भुजबळांची चौकशी का नाही ? -सोमय्या

15 ऑक्टोबरभाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आरोप केले आहे. भुजबळांच्या गैरव्यवहारांच्या आरोपांची सहा महिने झाली तरी सरकार अजून चौकशी का करत नाही असा सवाल सोमय्यांनी केला. भुजबळ कुटुंबीयांच्या हेक्स वर्ल्ड प्रोजेक्ट मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारीही लाभार्थी आहेत, असा आरोप करत पीडब्ल्यूडी (PWD) विभागाच्या 17 अधिकार्‍यांची यादीही किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली. भुजबळ यांचे जावई जितेंद्र वाघ हेसुद्धा समीर आणि पंकज भुजबळ यांच्या कंपन्यांमध्ये संचालक आहेत, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला. या अधिकार्‍यांना सवलतीच्या दरात हेक्स वर्ल्ड प्रोजेक्ट मध्ये घरं मिळाली की मोफत घरं मिळाली ? याचा शोध लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं घ्यावा तसेच . 16 जुलै 2012 ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं राज्य सरकारकडे भुजबळ यांच्या गुप्त चौकशीला परवानगी देण्याची मागणी केलीय. मात्र, राज्य सरकार या पत्रावर चौकशीचे आदेश का देत नाही ? एमएमआरडीएच्या रेंटल हाऊसिंगच्या कंत्राटाचा लाभही भुजबळ कुटुंबियांच्या कंपन्याना मिळालाय, असा दावाही सोमय्यांनी केला.खारघरमधील प्रकल्पात यांना मिळाली घरं एस.व्ही. चौबे, व्ही.के.पवार, नितिन पगारे, टी.एन. विरकर, डी.जी. विडेकर, एच. बी. पाटील, बी. के. घोसाळकर

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 15, 2012 11:30 AM IST

अजून भुजबळांची चौकशी का नाही ? -सोमय्या

15 ऑक्टोबरभाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आरोप केले आहे. भुजबळांच्या गैरव्यवहारांच्या आरोपांची सहा महिने झाली तरी सरकार अजून चौकशी का करत नाही असा सवाल सोमय्यांनी केला. भुजबळ कुटुंबीयांच्या हेक्स वर्ल्ड प्रोजेक्ट मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारीही लाभार्थी आहेत, असा आरोप करत पीडब्ल्यूडी (PWD) विभागाच्या 17 अधिकार्‍यांची यादीही किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली. भुजबळ यांचे जावई जितेंद्र वाघ हेसुद्धा समीर आणि पंकज भुजबळ यांच्या कंपन्यांमध्ये संचालक आहेत, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला. या अधिकार्‍यांना सवलतीच्या दरात हेक्स वर्ल्ड प्रोजेक्ट मध्ये घरं मिळाली की मोफत घरं मिळाली ? याचा शोध लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं घ्यावा तसेच . 16 जुलै 2012 ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं राज्य सरकारकडे भुजबळ यांच्या गुप्त चौकशीला परवानगी देण्याची मागणी केलीय. मात्र, राज्य सरकार या पत्रावर चौकशीचे आदेश का देत नाही ? एमएमआरडीएच्या रेंटल हाऊसिंगच्या कंत्राटाचा लाभही भुजबळ कुटुंबियांच्या कंपन्याना मिळालाय, असा दावाही सोमय्यांनी केला.

खारघरमधील प्रकल्पात यांना मिळाली घरं एस.व्ही. चौबे, व्ही.के.पवार, नितिन पगारे, टी.एन. विरकर, डी.जी. विडेकर, एच. बी. पाटील, बी. के. घोसाळकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 15, 2012 11:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close