S M L

एनजीओ गैरव्यवहाराप्रकरणी काँग्रेस खुर्शीद यांच्या पाठिशी

13 ऑक्टोबरकेंद्रीय कायदा मंत्री सलमान खुर्शीद सध्या चांगलेच अडचणीत सापडले आहे. आर्थिक घोटाळ्याच्या आरोपावरून इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल यांनी खुर्शीद यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पण काँग्रेसनं ही मागणी धुडकावून लावलीय. एनजीओमध्ये केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय कायदा मंत्री सलमान खुर्शीद यांच्या राजीनाम्याची मागणी अरविंद केजरीवाल यांनी लावून धरलीय. दिल्लीजवळच्या बवाना तुरुंगात एक रात्र घालवल्यानंतर पुन्हा एकदा केजरीवाल यांनी खुर्शीदांविरोधात आंदोलन केलं. पण काँग्रेस खुर्शीद यांच्या पाठिशी भक्कमपणे उभी आहे. खुर्शीद यांच्या एनजीओसाठी सामाजिक न्याय मंत्रालयाकडून निधी मंजूर करून घेण्यासाठी उत्तर प्रदेशच्या सनदी अधिकार्‍याची बनावट स्वाक्षरी करण्यात आल्याचा आरोप आहे. यासंबंधीची कागदपत्रं आयबीएन नेटवर्कच्याही हाती लागलीय. पण सलमान खुर्शीद आणि त्यांच्या पत्नीनं हे आरोप फेटाळलेत. पण या निरीक्षण अहवालात जे आरोप करण्यात आलेत, त्यामागे कायदा मंत्रीच आहेत असं म्हणता येत नाही असं कॅगचा अहवाल म्हणतो. तर या आरोपांमागे समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाचा हात असावा अशी शक्यता काँग्रेसला वाटतेय. दरम्यान, या प्रकरणात चौकशी करण्याचं आश्वसान उत्तर प्रदेशच्या सामाजिक न्याय मंत्र्यांनी दिलंय. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्राचं भविष्य अखिलेश यादव यांच्या हाती आहे, असंच म्हणावं लागेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 13, 2012 03:59 PM IST

एनजीओ गैरव्यवहाराप्रकरणी काँग्रेस खुर्शीद यांच्या पाठिशी

13 ऑक्टोबर

केंद्रीय कायदा मंत्री सलमान खुर्शीद सध्या चांगलेच अडचणीत सापडले आहे. आर्थिक घोटाळ्याच्या आरोपावरून इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल यांनी खुर्शीद यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पण काँग्रेसनं ही मागणी धुडकावून लावलीय.

एनजीओमध्ये केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय कायदा मंत्री सलमान खुर्शीद यांच्या राजीनाम्याची मागणी अरविंद केजरीवाल यांनी लावून धरलीय. दिल्लीजवळच्या बवाना तुरुंगात एक रात्र घालवल्यानंतर पुन्हा एकदा केजरीवाल यांनी खुर्शीदांविरोधात आंदोलन केलं. पण काँग्रेस खुर्शीद यांच्या पाठिशी भक्कमपणे उभी आहे.

खुर्शीद यांच्या एनजीओसाठी सामाजिक न्याय मंत्रालयाकडून निधी मंजूर करून घेण्यासाठी उत्तर प्रदेशच्या सनदी अधिकार्‍याची बनावट स्वाक्षरी करण्यात आल्याचा आरोप आहे. यासंबंधीची कागदपत्रं आयबीएन नेटवर्कच्याही हाती लागलीय. पण सलमान खुर्शीद आणि त्यांच्या पत्नीनं हे आरोप फेटाळलेत.

पण या निरीक्षण अहवालात जे आरोप करण्यात आलेत, त्यामागे कायदा मंत्रीच आहेत असं म्हणता येत नाही असं कॅगचा अहवाल म्हणतो. तर या आरोपांमागे समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाचा हात असावा अशी शक्यता काँग्रेसला वाटतेय. दरम्यान, या प्रकरणात चौकशी करण्याचं आश्वसान उत्तर प्रदेशच्या सामाजिक न्याय मंत्र्यांनी दिलंय. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्राचं भविष्य अखिलेश यादव यांच्या हाती आहे, असंच म्हणावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 13, 2012 03:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close