S M L

अर्थमंत्रालयातील अनेक कामं अपूर्ण- गृहमंत्री चिंदबरम

1 डिसेंबर, दिल्ली अर्थमंत्री पी चिदंबरम यांची नियुक्ती नवे केंद्रीय गृहमंत्री म्हणून झालीय मात्र त्यांनी अर्थमंत्रालयात अनेक कामं अपूर्ण राहिल्याचा खेद व्यक्त केलाय. त्यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान मनमोहन सिंग हे अर्थव्यवस्थेला योग्य दिशा देण्यासाठी समर्थ असल्याचंही ते यावेळी म्हणाले. पुढचे अर्थमंत्री सी. रंगराजन असतील, असे संकेतही त्यांनी यावेळी दिले. चिदंबरम यांनी पुढील वर्षात देशाचा विकास दर सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान राहील आणि महागाई दरही आटोक्यात राहील, असा विश्वास व्यक्त केलाय. रिझर्व्ह बँक आणि अर्थमंत्रालय यांच्यात यापुढे सामंजस्य राहील, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवलीय. भारतावर जगातल्या आर्थिक घडामोडींचा परिणाम जाणवत असला तरी ही मंदी नसल्याचं त्यांनी पुन्हा एकदा जाताना स्पष्ट केलंय.' मला जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं, तेव्हा मी प्रथम हे पद स्वीकारायला उत्सुक नव्हतो पण गृहमंत्रीपद स्वीकारणं हे माझ्यासाठी एक कर्तव्याचा भाग होतं. मला इथे नियुक्त करण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला आणि अर्थमंत्रीपद आता पंतप्रधानांकडेच राहील ', असं चिंदबरम यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 1, 2008 12:08 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 1, 2008 12:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close