S M L

सलमान खुर्शीदांनी आरोप फेटाळले

14 ऑक्टोबरअपंगांसाठीचा निधी लाटल्याच्या आरो़पंाचं आज केंद्रीय कायदा मंत्री सलमान खुर्शीद यांनी आज खंडन केलं. दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन खुर्शीद यांनी उत्तर प्रदेशात अपंगांसाठी 17 शिबीरं घेतल्याचे पुरावे सादर केले. यावेळी त्यांनी आपण रस्त्यावरील लोकांच्या प्रश्नांना उत्तरं देणार नाही अशा शब्दात अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना बगल दिली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी लुईस खुर्शीद याही उपस्थित होत्या. आपल्यावर झालेले आरोप चुकीचे आहे आणि ज्या न्यूज चॅनेलने ते स्टिंग केले होते ते साफ खोटं होतं याप्रकरणी त्यांनी कायदेशीर नोटीस पाठवणार असून त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचंही खुर्शीद यांनी स्पष्ट केलं. तब्बल दोन तास चाललेल्या या पत्रकार परिषदेत त्यांनी आपलं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. पण पत्रकारारांच्या उलटसूलट प्रश्नांना उत्तर देताना मात्र एरवी शांत दिसणारे सलमान खुर्शीद आज चांगलेच भडकले. पत्रकार परिषदेत पत्रकार आणि सलमान खुर्शीद यांच्यात अनेकवेळा खडाजंगीही झाली. खुर्शीदांना केजरीवाल यांचे 5 सवाल केंद्रीय कायदा मंत्री सलमान खुर्शीद यांच्यावरील आरोपांच्या चौकशीला जाणूनबुजून उशीर केला जातोय. याचसंदर्भात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि केंद्र सरकारमध्ये डील झाल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. आजही खुर्शीद यांच्या राजीनाम्याचा मागणीसाठी केजरीवाल यांच्यासह इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग आणि सलमान खुर्शीद यांच्या घरांपुढे निदर्शनं केली. त्यानंतर केजरीवाल यांनी खुर्शीद यांना या भ्रष्टाचारासंदर्भात 5 प्रश्न जाहीरपणे विचारलेत आणि त्याची उत्तरं खुर्शीद यांनी द्यावीत असं आव्हान दिलंय. दरम्यान, खुर्शीद आज सकाळी लंडनहून दिल्लीत दाखल होताच विमानतळावर इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. दरम्यान खुर्शीद यांनी राजीनाम्याची मागणी फेटाळत अरविंद केजरीवाल आणि अरुण पुरी यांनीच राजीनामा द्यावा अशी उलटी मागणी केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 14, 2012 10:32 AM IST

सलमान खुर्शीदांनी आरोप फेटाळले

14 ऑक्टोबर

अपंगांसाठीचा निधी लाटल्याच्या आरो़पंाचं आज केंद्रीय कायदा मंत्री सलमान खुर्शीद यांनी आज खंडन केलं. दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन खुर्शीद यांनी उत्तर प्रदेशात अपंगांसाठी 17 शिबीरं घेतल्याचे पुरावे सादर केले. यावेळी त्यांनी आपण रस्त्यावरील लोकांच्या प्रश्नांना उत्तरं देणार नाही अशा शब्दात अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना बगल दिली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी लुईस खुर्शीद याही उपस्थित होत्या. आपल्यावर झालेले आरोप चुकीचे आहे आणि ज्या न्यूज चॅनेलने ते स्टिंग केले होते ते साफ खोटं होतं याप्रकरणी त्यांनी कायदेशीर नोटीस पाठवणार असून त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचंही खुर्शीद यांनी स्पष्ट केलं. तब्बल दोन तास चाललेल्या या पत्रकार परिषदेत त्यांनी आपलं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. पण पत्रकारारांच्या उलटसूलट प्रश्नांना उत्तर देताना मात्र एरवी शांत दिसणारे सलमान खुर्शीद आज चांगलेच भडकले. पत्रकार परिषदेत पत्रकार आणि सलमान खुर्शीद यांच्यात अनेकवेळा खडाजंगीही झाली.

खुर्शीदांना केजरीवाल यांचे 5 सवाल

केंद्रीय कायदा मंत्री सलमान खुर्शीद यांच्यावरील आरोपांच्या चौकशीला जाणूनबुजून उशीर केला जातोय. याचसंदर्भात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि केंद्र सरकारमध्ये डील झाल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. आजही खुर्शीद यांच्या राजीनाम्याचा मागणीसाठी केजरीवाल यांच्यासह इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग आणि सलमान खुर्शीद यांच्या घरांपुढे निदर्शनं केली. त्यानंतर केजरीवाल यांनी खुर्शीद यांना या भ्रष्टाचारासंदर्भात 5 प्रश्न जाहीरपणे विचारलेत आणि त्याची उत्तरं खुर्शीद यांनी द्यावीत असं आव्हान दिलंय. दरम्यान, खुर्शीद आज सकाळी लंडनहून दिल्लीत दाखल होताच विमानतळावर इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. दरम्यान खुर्शीद यांनी राजीनाम्याची मागणी फेटाळत अरविंद केजरीवाल आणि अरुण पुरी यांनीच राजीनामा द्यावा अशी उलटी मागणी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 14, 2012 10:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close