S M L

माहेरवरुन पैसे आणले नाही म्हणून पतीने केली पत्नीची हत्या

15 ऑक्टोबरमाहेरवरुन घरासाठी पैसे आणले नाहीत, म्हणून एका रेल्वे पोलीस कॉन्स्टेबलनं पत्नीची हत्या केलीय. हेमराज परदेशी असं या आरोपीचं नाव आहे.डोंबिवलीत अंकुर सोसायटीतल्या राहत्या घरी जबर मारहाण करुन हेमराजनं पत्नी सरीताची हत्या केली. हेमराजला रामनगर पोलिसांनी अटक केलीय.4 वर्षापूर्वी या दोघांचं लग्न झालं होतं. त्यांना 2 वर्षाचा एक मुलगाही आहे. लग्न झाल्यापासूनच माहेरुन घरासाठी पैसे आण असा तगादा हेमराजनं सरीताकडे लावला होता. याच कारणावरुन हेमराज सरीताला नेहमी मारहाण करायचा. 6 महिन्यापूर्वी दोघांच्या कुटुंबीयांनी एकत्रीत बैठक घेऊन हेमराजला समजावलेही होते पण त्याचा काही उपयोग झाला नाही. सरीताच्या बहिणीनं दिलेल्या फिर्यादीनुसार हेमराजसह त्याचे आई,वडील आणि दोन्ही भाऊ यांना आरोपी करण्यात आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 15, 2012 05:06 PM IST

माहेरवरुन पैसे आणले नाही म्हणून पतीने केली पत्नीची हत्या

15 ऑक्टोबर

माहेरवरुन घरासाठी पैसे आणले नाहीत, म्हणून एका रेल्वे पोलीस कॉन्स्टेबलनं पत्नीची हत्या केलीय. हेमराज परदेशी असं या आरोपीचं नाव आहे.डोंबिवलीत अंकुर सोसायटीतल्या राहत्या घरी जबर मारहाण करुन हेमराजनं पत्नी सरीताची हत्या केली. हेमराजला रामनगर पोलिसांनी अटक केलीय.4 वर्षापूर्वी या दोघांचं लग्न झालं होतं. त्यांना 2 वर्षाचा एक मुलगाही आहे. लग्न झाल्यापासूनच माहेरुन घरासाठी पैसे आण असा तगादा हेमराजनं सरीताकडे लावला होता. याच कारणावरुन हेमराज सरीताला नेहमी मारहाण करायचा. 6 महिन्यापूर्वी दोघांच्या कुटुंबीयांनी एकत्रीत बैठक घेऊन हेमराजला समजावलेही होते पण त्याचा काही उपयोग झाला नाही. सरीताच्या बहिणीनं दिलेल्या फिर्यादीनुसार हेमराजसह त्याचे आई,वडील आणि दोन्ही भाऊ यांना आरोपी करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 15, 2012 05:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close