S M L

डीएलएफ-वडरांमधील जमीन व्यवहार रद्द

16 ऑक्टोबरअरविंद केजरीवाल यांनी सोनियांचे जावई रॉबर्ट वडरा, बांधकाम क्षेत्रातली मोठी कंपनी असलेली डीएलएफ आणि हरियाणा सरकार यांच्यातल्या हितसंबंधांवर प्रश्नचिन्हं उपस्थित केले होते. त्यानंतर या तिघांमध्ये भूखंड खरेदीवरुन झालेल्या व्यवहारांमध्ये घोटाळा झाल्याचे आरोप होऊ लागले. यात आता आणखी भर पडलीय. हरियाणाचे सनदी अधिकारी असलेले अशोक खेमका यांनी वडरा आणि डीएलएफमधला एक जमीन व्यवहार रद्द केलाय. वडरा यांनी डीएलएफला मानेसर-शिखोपूर इथं 58 कोटी रुपयांना पावणे चार एकर भूखंड विकला होता. पण हा व्यवहार करताना हरियाणा सरकारच्या जमीन हस्तांतरण कायद्याचं उल्लंघन करण्यात आलं. त्यामुळे हरियाणाचे भूमीअभिलेख महासंचालक खेमका यांनी हा व्यवहार रद्द केला. पण विशेष म्हणजे हा करार रद्द करणार्‍या खेमका यांची बदली करण्यात आलीय. 8 ऑक्टोबरला खेमका यांनी याप्रकरणाची चौकशी सुरू केली. पण 11 ऑक्टोबरला त्यांच्या बदलीचे आदेश निघाले. त्यामुळे वडरांविरोधात कारवाई केल्यानं हरियाणा सरकारनं खेमकांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 16, 2012 10:26 AM IST

डीएलएफ-वडरांमधील जमीन व्यवहार रद्द

16 ऑक्टोबर

अरविंद केजरीवाल यांनी सोनियांचे जावई रॉबर्ट वडरा, बांधकाम क्षेत्रातली मोठी कंपनी असलेली डीएलएफ आणि हरियाणा सरकार यांच्यातल्या हितसंबंधांवर प्रश्नचिन्हं उपस्थित केले होते. त्यानंतर या तिघांमध्ये भूखंड खरेदीवरुन झालेल्या व्यवहारांमध्ये घोटाळा झाल्याचे आरोप होऊ लागले. यात आता आणखी भर पडलीय. हरियाणाचे सनदी अधिकारी असलेले अशोक खेमका यांनी वडरा आणि डीएलएफमधला एक जमीन व्यवहार रद्द केलाय. वडरा यांनी डीएलएफला मानेसर-शिखोपूर इथं 58 कोटी रुपयांना पावणे चार एकर भूखंड विकला होता. पण हा व्यवहार करताना हरियाणा सरकारच्या जमीन हस्तांतरण कायद्याचं उल्लंघन करण्यात आलं. त्यामुळे हरियाणाचे भूमीअभिलेख महासंचालक खेमका यांनी हा व्यवहार रद्द केला. पण विशेष म्हणजे हा करार रद्द करणार्‍या खेमका यांची बदली करण्यात आलीय. 8 ऑक्टोबरला खेमका यांनी याप्रकरणाची चौकशी सुरू केली. पण 11 ऑक्टोबरला त्यांच्या बदलीचे आदेश निघाले. त्यामुळे वडरांविरोधात कारवाई केल्यानं हरियाणा सरकारनं खेमकांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 16, 2012 10:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close