S M L

सचिनला ऑस्ट्रेलियन किताब;मॅथ्यू हेडन नाराज

19 ऑक्टोबरमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ऑस्ट्रेलियाचा मानाचा 'ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया' किताब देण्याची घोषणा झाल्यानंतर ऑस्ट्रेलियात तीव्र नाराजी व्यक्त होतं आहे. भारत दौर्‍यावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान ज्युलिआ गिलार्ड यांनी याची घोषणा केली. पण त्यांच्या निर्णयामुळे ऑस्ट्रेलियात 'भूंकप' झाला आहे. आपला देश सोडून बाहेरच्या व्यक्तीला हा किताब का दिला जातो यावर तीव्र आक्षेप घेतला जात आहे. त्यातच भरात भर ऑस्ट्रेलियाचा माजी धडाकेबाज बॅट्समन मॅथ्यू हेडनही उतरला आहे. मॅथ्यू हेडननं सचिनला हा किताब देण्यावर असहमती दर्शवली. 'ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया' हा किताब फक्त ऑस्ट्रेलियन व्यक्तीलाच दिला जावा अशी मागणी त्यानं केली आहे. आपल्या देशाच्या काही खास गोष्टी आहेत आणि म्हणून तो फक्त आपल्या देशातील नागरीकालाच देण्यात याव्यात. जर सचिन ऑस्ट्रेलियात राहत असता तर त्याला पंतप्रधानांचं पदक द्यावं पण खरी गोष्ट म्हणजे सचिन ऑस्ट्रेलियात नाही तर भारतात राहतोय हे विसरुन चालणार नाही असं हेडन म्हणाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 19, 2012 01:29 PM IST

सचिनला ऑस्ट्रेलियन किताब;मॅथ्यू हेडन नाराज

19 ऑक्टोबर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ऑस्ट्रेलियाचा मानाचा 'ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया' किताब देण्याची घोषणा झाल्यानंतर ऑस्ट्रेलियात तीव्र नाराजी व्यक्त होतं आहे. भारत दौर्‍यावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान ज्युलिआ गिलार्ड यांनी याची घोषणा केली. पण त्यांच्या निर्णयामुळे ऑस्ट्रेलियात 'भूंकप' झाला आहे. आपला देश सोडून बाहेरच्या व्यक्तीला हा किताब का दिला जातो यावर तीव्र आक्षेप घेतला जात आहे. त्यातच भरात भर ऑस्ट्रेलियाचा माजी धडाकेबाज बॅट्समन मॅथ्यू हेडनही उतरला आहे. मॅथ्यू हेडननं सचिनला हा किताब देण्यावर असहमती दर्शवली. 'ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया' हा किताब फक्त ऑस्ट्रेलियन व्यक्तीलाच दिला जावा अशी मागणी त्यानं केली आहे. आपल्या देशाच्या काही खास गोष्टी आहेत आणि म्हणून तो फक्त आपल्या देशातील नागरीकालाच देण्यात याव्यात. जर सचिन ऑस्ट्रेलियात राहत असता तर त्याला पंतप्रधानांचं पदक द्यावं पण खरी गोष्ट म्हणजे सचिन ऑस्ट्रेलियात नाही तर भारतात राहतोय हे विसरुन चालणार नाही असं हेडन म्हणाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 19, 2012 01:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close