S M L

किंगफिशर अखेर जमिनीवर; लायसन्स रद्द

20 ऑक्टोबरडबघाई आणि कर्जात बुडालेल्या 'किंगफिशर'चे अखेर पंख छाटण्यात आले आहे. आज हवाई वाहतूक महासंचालकांनी किंगफिशरला दणका दिला. किंगफिशर एअरलाईन्सचं लायसन्स रद्द करण्यात आलंय. नवा आराखडा येईपर्यंत लायसन्स रद्द करण्याचे आदेश महासंचालकांनी दिले आहे. किंगफिशरनं नोटीसला उत्तर न दिल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून किंगफिशर विरुद्ध पायलट्सचा संघर्ष सुरु आहे. पगार न मिळाल्यामुळे कर्मचार्‍यांनी संप पुकारला आहे त्यामुळे किंगफिशरच्या उड्डाणवर याचा परिणाम झाला असून अनेक उड्डाणं रद्द करण्यात आलीय. अगोदरच बँकांचं कर्ज आणि कर्मचार्‍यांच्या संपामुळे किंगफिशरचा पाय आणखी खोलात गेला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 20, 2012 11:23 AM IST

किंगफिशर अखेर जमिनीवर; लायसन्स रद्द

20 ऑक्टोबर

डबघाई आणि कर्जात बुडालेल्या 'किंगफिशर'चे अखेर पंख छाटण्यात आले आहे. आज हवाई वाहतूक महासंचालकांनी किंगफिशरला दणका दिला. किंगफिशर एअरलाईन्सचं लायसन्स रद्द करण्यात आलंय. नवा आराखडा येईपर्यंत लायसन्स रद्द करण्याचे आदेश महासंचालकांनी दिले आहे. किंगफिशरनं नोटीसला उत्तर न दिल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून किंगफिशर विरुद्ध पायलट्सचा संघर्ष सुरु आहे. पगार न मिळाल्यामुळे कर्मचार्‍यांनी संप पुकारला आहे त्यामुळे किंगफिशरच्या उड्डाणवर याचा परिणाम झाला असून अनेक उड्डाणं रद्द करण्यात आलीय. अगोदरच बँकांचं कर्ज आणि कर्मचार्‍यांच्या संपामुळे किंगफिशरचा पाय आणखी खोलात गेला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 20, 2012 11:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close