S M L

जागावाटपावरून आघाडीत आतापासूनच रस्सीखेच

22 ऑक्टोबरसिंचन घोटाळ्यावरून आघाडीत सुरु झालेली तु-तु मैं मैं आता खुर्चीवर येऊन ठेपली आहे. आघाडीत 2014 निवडणुकांचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहे आणि जागा वाटपावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आतापासूनच वाद होऊ लागले आहे. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसकडून जास्त जागा मागणार असल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितलंय. त्यावर राष्ट्रवादी नेहमी अशी वक्तव्य करुन दबाव आणत असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली. तसंच गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचं काय झालं तो इतिहास ताजा आहे, असा टोलाही त्यांनी लगावलाय. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष आता पुन्हा एकदा पेटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं दोन दिवसांचं राज्यव्यापी अधिवेशन काल संपलं. पण या अधिवेशनात सर्व नेत्यांच्या भाषणांमधून काँग्रेस आणि मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न दिसला. पण आता काँग्रेसनं राष्ट्रवादीला उत्तर दिलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 22, 2012 09:26 AM IST

जागावाटपावरून आघाडीत आतापासूनच रस्सीखेच

22 ऑक्टोबर

सिंचन घोटाळ्यावरून आघाडीत सुरु झालेली तु-तु मैं मैं आता खुर्चीवर येऊन ठेपली आहे. आघाडीत 2014 निवडणुकांचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहे आणि जागा वाटपावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आतापासूनच वाद होऊ लागले आहे. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसकडून जास्त जागा मागणार असल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितलंय. त्यावर राष्ट्रवादी नेहमी अशी वक्तव्य करुन दबाव आणत असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली. तसंच गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचं काय झालं तो इतिहास ताजा आहे, असा टोलाही त्यांनी लगावलाय. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष आता पुन्हा एकदा पेटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं दोन दिवसांचं राज्यव्यापी अधिवेशन काल संपलं. पण या अधिवेशनात सर्व नेत्यांच्या भाषणांमधून काँग्रेस आणि मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न दिसला. पण आता काँग्रेसनं राष्ट्रवादीला उत्तर दिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2012 09:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close