S M L

धुळ्यात दोन महिन्यात डेंग्यूचे 5 बळी

26 ऑक्टोबरधुळे जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात डेंग्यूचे 5 बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काल गुरूवारी शहरात योगेश दामोदर (वय 30) या शासकीय कर्मचार्‍याचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. धुळ्यातल्या या डेंग्युच्या बळींमध्ये जास्त संख्या लहान मुलांची आहे. यामध्ये तुषार देवळे या 6 महिन्यांच्या आणि नायबा शेख या 10 महिन्यांच्या चिमुकल्यांचा जीव गमवावा लागला आहे. गेल्या महिनाभरात डेंग्युच्या पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या 200च्या वर पोहोचली आहे. पण, त्यादृष्टीनं आरोग्य प्रशासनाच्या पातळीवर फार गांभीर्य दिसत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.डेंग्यूच्या मृतांची नाव योगेश दामोदर (वय 30), दामिनी सोनवणे, (वय 6), नायबा शेख (वय 10 महिने), तुषार देवळे (6 महिने) आणि रेहान तांबोळी (वय 3 वर्ष)नागपूरमध्येही डेंग्यूचा फैलावगेल्या दोन महिन्यात शहरात डेंग्युचे 39 पेशंट आढळले आहेत. शहरातील डेंग्यू रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिका आयुक्तांनी आरोग्य अधिका-यांना यावर तातडीने उपाय योजना करण्याचे आदेश दिले आहे. पण डेंग्यूमुळे अजून एकाही पेशंटचा मृत्यू झाला नसल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 26, 2012 12:39 PM IST

धुळ्यात दोन महिन्यात डेंग्यूचे 5 बळी

26 ऑक्टोबर

धुळे जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात डेंग्यूचे 5 बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काल गुरूवारी शहरात योगेश दामोदर (वय 30) या शासकीय कर्मचार्‍याचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. धुळ्यातल्या या डेंग्युच्या बळींमध्ये जास्त संख्या लहान मुलांची आहे. यामध्ये तुषार देवळे या 6 महिन्यांच्या आणि नायबा शेख या 10 महिन्यांच्या चिमुकल्यांचा जीव गमवावा लागला आहे. गेल्या महिनाभरात डेंग्युच्या पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या 200च्या वर पोहोचली आहे. पण, त्यादृष्टीनं आरोग्य प्रशासनाच्या पातळीवर फार गांभीर्य दिसत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.डेंग्यूच्या मृतांची नाव योगेश दामोदर (वय 30), दामिनी सोनवणे, (वय 6), नायबा शेख (वय 10 महिने), तुषार देवळे (6 महिने) आणि रेहान तांबोळी (वय 3 वर्ष)

नागपूरमध्येही डेंग्यूचा फैलावगेल्या दोन महिन्यात शहरात डेंग्युचे 39 पेशंट आढळले आहेत. शहरातील डेंग्यू रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिका आयुक्तांनी आरोग्य अधिका-यांना यावर तातडीने उपाय योजना करण्याचे आदेश दिले आहे. पण डेंग्यूमुळे अजून एकाही पेशंटचा मृत्यू झाला नसल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 26, 2012 12:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close