S M L

'आदर्श'ला जमीन देण्याची जबाबदारी सरकारने विलासरावांवर ढकलली

23 ऑक्टोबरबहुचर्चित आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणाला आता नवं वळण मिळालंय. चौकशी आयोगासमोर राज्य सरकारनं नव्यानं प्रतिज्ञापत्र सादर करुन घोटाळ्याची जबाबदारी एकाप्रकारे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर ढकलली आहे. न्यायमूर्ती जे.ए.पाटील आणि पी. सुब्रमण्यम यांच्या न्यायालयीन चौकशी आयोगासमोर राज्याचे मुख्य सचिन जे.के.बांठिया यांनी सोमवारी प्रतिज्ञापत्र सादर केलं. यामध्ये मुंबईतले भूखंड देण्याचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतात. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आदर्श सोसायटीला जमीन दिली. त्यानंतर इरादपत्र तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिलं असं राज्य सरकारच्या चार पानी प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलंय. या निमित्तानं राज्य सरकारनं पहिल्यांदाचआदर्शला जमीन बहाल करण्यास विलासराव देशमुख जबाबदार आहेत, असं प्रतिज्ञापत्रात नमूद केलंय. त्यामुळे याप्रकरणातून एकाप्रकारे सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण यांना वाचवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे हे स्पष्ट होतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 23, 2012 11:01 AM IST

'आदर्श'ला जमीन देण्याची जबाबदारी सरकारने विलासरावांवर ढकलली

23 ऑक्टोबर

बहुचर्चित आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणाला आता नवं वळण मिळालंय. चौकशी आयोगासमोर राज्य सरकारनं नव्यानं प्रतिज्ञापत्र सादर करुन घोटाळ्याची जबाबदारी एकाप्रकारे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर ढकलली आहे. न्यायमूर्ती जे.ए.पाटील आणि पी. सुब्रमण्यम यांच्या न्यायालयीन चौकशी आयोगासमोर राज्याचे मुख्य सचिन जे.के.बांठिया यांनी सोमवारी प्रतिज्ञापत्र सादर केलं. यामध्ये मुंबईतले भूखंड देण्याचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतात. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आदर्श सोसायटीला जमीन दिली. त्यानंतर इरादपत्र तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिलं असं राज्य सरकारच्या चार पानी प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलंय. या निमित्तानं राज्य सरकारनं पहिल्यांदाचआदर्शला जमीन बहाल करण्यास विलासराव देशमुख जबाबदार आहेत, असं प्रतिज्ञापत्रात नमूद केलंय. त्यामुळे याप्रकरणातून एकाप्रकारे सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण यांना वाचवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे हे स्पष्ट होतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 23, 2012 11:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close