S M L

मुख्यमंत्री पदासाठी शर्यत सुरू

2 डिसेंबर मुंबईमुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी शर्यत सुरू झाली असून यात पृथ्वीराज चव्हाण, सुशिलकुमार शिंदे,अशोक चव्हाण या नेत्यांची नावं प्रामुख्यानं चर्चेत आहेत.सगळ्यात आधी नाव चर्चेत आलं ते पृथ्वीराज चव्हाण यांचं. पृथ्वीराज चव्हाण सध्या दिल्लीत पंतप्रधान कार्यालयाचा कारभार सांभाळत आहेत. पण राज्यात यायला ते फारसे उत्सुक नाहीत असं नेहमीच म्हटलं गेलंय. हीच चर्चा यावेळीही होत राहिली. त्यामुळेच की काय मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये सुशिलकुमार शिंदे आले. एकदा जेमतेम वर्षभरासाठी मुख्यमंत्री झालेला हा काँग्रेसमन सोनियांचा निष्ठावंत सैनिक आहे. त्यांच्या नावाची चर्चा सुरू असातानाच अहमद पटेल आणि ए. के. अँटनी सोनियांना भेटले. त्यामुळे त्यांच्या खलबतांमध्ये नक्की काय झालंय याचे तर्क वितर्क केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर आता चालले आहेत.सुशिलकुमारांना शरद पवारांनीच राजकारणात आणलं. त्यामुळे पवार त्यांच्यासाठी अनुकूल असतील पण सध्या पवारांशी नारायण राणेंनी जुळवून घेतलंय. त्यामुळे काँग्रेसमधल्या सगळ्यात उत्सुक नेत्याचं नाव नव्यानं पुढं आलं. पण ए. के.अँटनी या नावाला उत्सुक दिसत नाही. आता यासर्व तर्क-वितर्कातून काँग्रेसचा मुख्यमंत्री राज्यातून येणार की केंद्रातून हे सोनिया गांधीनाच ठाऊक . पण आपापले पत्ते पुढे ढकलण्यासाठी जो तो कामाला लागलाय हे मात्र खरंय.राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता निवडण्यासाठी आज दुपारी 12 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत निवडलेल्या नेत्याला उपमुख्यमंत्री पद मिळेल, अशी चर्चा आहे. मुंबईतल्या नरिमन पॉईण्टमधल्या राष्ट्रवादीच्या ऑफीसमध्ये ही बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्रीपद छगन भुजबळ यांनाच मिळण्याची दाट शक्यता आहे. बैठकीत नेत्याची निवड गुप्त मदतान पद्धतीनं होणार होती. पण, भुजबळांनी त्याला विरोध केला. बहुमतानं ही निवड व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. या बैठकीला अध्यक्ष शरद पवार मात्र उपस्थित राहणार नाहीत, असं सागंण्यात येतंय. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल तसंच राष्ट्रीय सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी बैठकीला हजर राहतील. गृहमंत्रीपद भुजबळ यांना द्यावं की नाही याबाबत रात्री उशीरापर्यंत निर्णय झाला नव्हता. हे पद अजित पवार यांना द्यावं, अशी पक्षाच्या एका गटाची मागणी आहे. रात्री भुजबळ यांच्या घरी एक बैठक झाली. या बैठकीला अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील आणि मधुकर पिचड उपस्थित होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 1, 2008 04:19 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 1, 2008 04:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close