S M L

सेट टॉप बॉक्स विरोधात शिवसेनेनं थोपटले दंड

29 ऑक्टोबरडिजीटल क्रांतीचा वसा घेत सेट टॉप बॉक्स लावा असा आग्रह सरकारने लावून धरा आहे मात्र आता याविरोधात शिवसेना मैदानात उतरली आहे. सेट टॉप बॉक्सची मुदत संपत आहे यासाठी आणखी तीन महिने मुदतवाढ देण्याची मागणी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरेंनी केली आहे. 31 ऑक्टोबर ही सेट टॉप बॉक्स बसवण्याची अंतिम मुदत केंद्राने अगोदरच जाहीर केली आहे आणि असे सेट टॉप बॉक्स बसवणं बंधनकारक आहे.या टप्प्यात मुंबई, दिल्ली,चैन्नआ,बंगलोर आदी मेट्रो शहरात सक्तीचा आदेश जारी केला आहे. 31 ऑक्टोबरनंतर ज्यांनी सेट टॉप बॉक्स लावले त्यांचं केबल कनेक्शन आपोआप बंद होणार आहे. पण सध्याच्या सणासुदीच्या काळात ग्राहकांवर अशी सक्ती करणे योग्य नाही असं शिवसेनेनं म्हटलंय. गरज पडल्यास आंदोलन करण्याचा इशाराही शिवसेनेनं दिलाय. खरं तर मुंबई शहरात अनेक केबल व्यावसायिक हे शिवसेना कार्यकर्ते असल्यानेच त्यांच्या हितसंबंधांसाठी शिवसेनेनं अचानक अशी भुमिका घेतल्याची चर्चा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 29, 2012 03:16 PM IST

सेट टॉप बॉक्स विरोधात शिवसेनेनं थोपटले दंड

29 ऑक्टोबर

डिजीटल क्रांतीचा वसा घेत सेट टॉप बॉक्स लावा असा आग्रह सरकारने लावून धरा आहे मात्र आता याविरोधात शिवसेना मैदानात उतरली आहे. सेट टॉप बॉक्सची मुदत संपत आहे यासाठी आणखी तीन महिने मुदतवाढ देण्याची मागणी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरेंनी केली आहे. 31 ऑक्टोबर ही सेट टॉप बॉक्स बसवण्याची अंतिम मुदत केंद्राने अगोदरच जाहीर केली आहे आणि असे सेट टॉप बॉक्स बसवणं बंधनकारक आहे.या टप्प्यात मुंबई, दिल्ली,चैन्नआ,बंगलोर आदी मेट्रो शहरात सक्तीचा आदेश जारी केला आहे. 31 ऑक्टोबरनंतर ज्यांनी सेट टॉप बॉक्स लावले त्यांचं केबल कनेक्शन आपोआप बंद होणार आहे. पण सध्याच्या सणासुदीच्या काळात ग्राहकांवर अशी सक्ती करणे योग्य नाही असं शिवसेनेनं म्हटलंय. गरज पडल्यास आंदोलन करण्याचा इशाराही शिवसेनेनं दिलाय. खरं तर मुंबई शहरात अनेक केबल व्यावसायिक हे शिवसेना कार्यकर्ते असल्यानेच त्यांच्या हितसंबंधांसाठी शिवसेनेनं अचानक अशी भुमिका घेतल्याची चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 29, 2012 03:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close