S M L

औरंगाबादकरांनो, डास पाळले तर दंड भरावा लागेल

31 ऑक्टोबरघराच्या परिसरामध्ये डासांच्या उत्त्पत्तीचं केंद्र आढळून आलं तर थेट दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा औरंगाबाद महापालिकेनं दिला आहे. शहरामध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाटयानं वाढ होत चालल्यानं महापालिका खडबडून जागी झालीय. त्यामुळं असा निर्णय घेण्यासाठी महापालिका सरसावली आहे. गेल्या 15 दिवसांपासून शहरातील महापालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये 40 रुग्णांवर उपचार सुरु आहेत, तर त्यापेक्षा अधिक रुग्ण खाजगी दवाखान्यामध्ये उपचार घेत आहेत. या सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता महापालिकेने वेगवेगळे उपाय सुरु केले आहेत. शहरातील जवळपास 56 हजार घरांची पाहणी केल्यानंतर 4 हजार घरामध्ये आणि त्या परिसरामध्ये डासांच्या उत्पत्तीचे केंद्र असल्याचं आढळून आलय. त्यामुळं त्या घरांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. मात्र या 4 हजार घरातील नागरिकांनी हे ठिकाणी स्वच्छ केले नाही तर त्यांच्यावर दंडात्मक आणि त्यापुढे कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी भुमिका महापालिकेने घेतली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 31, 2012 01:13 PM IST

औरंगाबादकरांनो, डास पाळले तर दंड भरावा लागेल

31 ऑक्टोबर

घराच्या परिसरामध्ये डासांच्या उत्त्पत्तीचं केंद्र आढळून आलं तर थेट दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा औरंगाबाद महापालिकेनं दिला आहे. शहरामध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाटयानं वाढ होत चालल्यानं महापालिका खडबडून जागी झालीय. त्यामुळं असा निर्णय घेण्यासाठी महापालिका सरसावली आहे. गेल्या 15 दिवसांपासून शहरातील महापालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये 40 रुग्णांवर उपचार सुरु आहेत, तर त्यापेक्षा अधिक रुग्ण खाजगी दवाखान्यामध्ये उपचार घेत आहेत. या सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता महापालिकेने वेगवेगळे उपाय सुरु केले आहेत. शहरातील जवळपास 56 हजार घरांची पाहणी केल्यानंतर 4 हजार घरामध्ये आणि त्या परिसरामध्ये डासांच्या उत्पत्तीचे केंद्र असल्याचं आढळून आलय. त्यामुळं त्या घरांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. मात्र या 4 हजार घरातील नागरिकांनी हे ठिकाणी स्वच्छ केले नाही तर त्यांच्यावर दंडात्मक आणि त्यापुढे कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी भुमिका महापालिकेने घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 31, 2012 01:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close