S M L

बी.व्ही.जी कंपनीवर प्राप्तीकर विभागाचा छापा

31 ऑक्टोबरहाऊसकिपिंग क्षेत्रातील नामांकित बी.व्ही.जी कंपनीच्या पिंपरी -चिंचवड इथल्या मुख्य कार्यालयावर आज प्राप्तीकर विभागाने छापा टाकला. प्राप्तीकर विभागाच्या अधिकार्‍यांनी बी.व्ही.जीच्या संबधित असणार्‍या अनेक फाईल्स ताब्यात घेतल्यात. अचानक टाकलेल्या या छाप्यासंदर्भात अधिकार्‍यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर बी.व्ही.जीचे संचालक हनुमंत गायकवाड यांचा फोन बंद असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. भारत विकास ग्रुप ही कंपनी हाऊस किपिंग क्षेत्रातील नामांकित कंपनी असून ,राष्ट्रपती भवनासह देशातील अनेक शासकीय, निमशासकीय आणि खाजगी कार्यालयांच्या स्वच्छतेचं काम बी.व्ही.जी मार्फत केलं जातं. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतील अनेक कार्यालयातील स्वच्छतेचं तसेच शहरातील कचरा वेचण्याचं कामही बी.व्ही.जी मार्फतच केलं जातं. या कामाची प्रशंसा करत खुद्द शरद पवारांनीही बी.व्ही.जीचा जाहीर गौरव केला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 31, 2012 05:06 PM IST

बी.व्ही.जी कंपनीवर प्राप्तीकर विभागाचा छापा

31 ऑक्टोबर

हाऊसकिपिंग क्षेत्रातील नामांकित बी.व्ही.जी कंपनीच्या पिंपरी -चिंचवड इथल्या मुख्य कार्यालयावर आज प्राप्तीकर विभागाने छापा टाकला. प्राप्तीकर विभागाच्या अधिकार्‍यांनी बी.व्ही.जीच्या संबधित असणार्‍या अनेक फाईल्स ताब्यात घेतल्यात. अचानक टाकलेल्या या छाप्यासंदर्भात अधिकार्‍यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर बी.व्ही.जीचे संचालक हनुमंत गायकवाड यांचा फोन बंद असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. भारत विकास ग्रुप ही कंपनी हाऊस किपिंग क्षेत्रातील नामांकित कंपनी असून ,राष्ट्रपती भवनासह देशातील अनेक शासकीय, निमशासकीय आणि खाजगी कार्यालयांच्या स्वच्छतेचं काम बी.व्ही.जी मार्फत केलं जातं. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतील अनेक कार्यालयातील स्वच्छतेचं तसेच शहरातील कचरा वेचण्याचं कामही बी.व्ही.जी मार्फतच केलं जातं. या कामाची प्रशंसा करत खुद्द शरद पवारांनीही बी.व्ही.जीचा जाहीर गौरव केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 31, 2012 05:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close