S M L

सिलिंडरवर 26 रुपयांची दरवाढ तूर्तास टळली

02 नोव्हेंबरफक्त काँग्रेसशासित राज्यातच नव्हे तर देशभरात 6 ऐवजी 9 सिलिंडरवर सबसिडी देण्याची मागणी काँग्रेसनं केंद्र सरकारकडे केली आहे. सरकार या मागणीवर विचार करतंय अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान गॅस सिलेंडरच्या किंमती ऑईल कंपनी नाहीतर सरकार ठरवणार असल्याचं पेट्रोलियम मंत्री विरप्पा मोईली यांनी स्पष्ट केलंय. यानंतर सरकार सिलिंडरच्या किंमतीवर नियंत्रण ठेवणार आहे. तसेच विनाअनुदानित सातव्या सिलेंडरची किंमत 26 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय केंद्रानं तूर्तास तरी स्थगित केला आहे. 7 व्या सिलेंडरसाठी 26 रुपये दरवाढ करण्याचा सरकारचा प्रस्ताव होता. त्यामुळे सातव्या सिलिंडरपासून प्रत्येक सिलिंडरसाठी 922 रुपये मोजावे लागणार होते. पण दरवाढीचा हा निर्णय सध्या स्थगित करण्यात आल्याची माहिती मिळतेय. सप्टेंबर महिन्यात वर्षातून फक्त 6 सिलेंडरवर अनुदान देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 2, 2012 09:55 AM IST

सिलिंडरवर 26 रुपयांची दरवाढ तूर्तास टळली

02 नोव्हेंबर

फक्त काँग्रेसशासित राज्यातच नव्हे तर देशभरात 6 ऐवजी 9 सिलिंडरवर सबसिडी देण्याची मागणी काँग्रेसनं केंद्र सरकारकडे केली आहे. सरकार या मागणीवर विचार करतंय अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान गॅस सिलेंडरच्या किंमती ऑईल कंपनी नाहीतर सरकार ठरवणार असल्याचं पेट्रोलियम मंत्री विरप्पा मोईली यांनी स्पष्ट केलंय. यानंतर सरकार सिलिंडरच्या किंमतीवर नियंत्रण ठेवणार आहे. तसेच विनाअनुदानित सातव्या सिलेंडरची किंमत 26 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय केंद्रानं तूर्तास तरी स्थगित केला आहे. 7 व्या सिलेंडरसाठी 26 रुपये दरवाढ करण्याचा सरकारचा प्रस्ताव होता. त्यामुळे सातव्या सिलिंडरपासून प्रत्येक सिलिंडरसाठी 922 रुपये मोजावे लागणार होते. पण दरवाढीचा हा निर्णय सध्या स्थगित करण्यात आल्याची माहिती मिळतेय. सप्टेंबर महिन्यात वर्षातून फक्त 6 सिलेंडरवर अनुदान देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 2, 2012 09:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close