S M L

'नॅशनल हेराल्ड'ची मालमत्ता सोनियांनी केली खासगी'

01 नोव्हेंबरजनता पार्टीचे अध्यक्ष सुब्रमण्यम स्वामी यांनी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर तोफ डागली. नॅशनल हेराल्ड डेली चालवणारं ट्रस्ट सोनिया आणि राहुल गांधींनी ताब्यात घेतलं. या व्यवहारात अनेक अनियमितता झाल्याचा आरोप स्वामींनी केला. असोसिएटेड जर्नल्स ताब्यात घेण्यासाठी त्यांनी यंग इंडियन ही खासगी कंपनी काढली. दिल्लीतलं 1600 कोेटींचं हेराल्ड हाऊस मिळवण्यासाठी हा व्यवहार करण्यात आला. असोसिएटेड जर्नल्समध्ये पंडित नेहरू, इंदिरा गांधी, फिरोझ गांधी हे आजही शेअरहोल्डर्स असल्याचं दाखवण्यात आलंय. असोसिएटेड जर्नल्सचं कर्ज फेडण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं 90 कोटींचं कर्ज दिलं. यंग इंडियन शेअरहोल्डरची बैठक सोनिया गांधींच्या निवासस्थानी झाली. या सर्व प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी सुब्रमण्यम स्वामी यांनी केलीय. सुब्रम्हण्यम स्वामी यांनी नेमके या आरोप केलेत ?पहिला आरोप:- सोनिया आणि राहुल गांधींनी यंग इंडियन नावाची खासगी कंपनी काढून असोसिएटेड जर्नल ट्रस्ट विकत घेतला - हा ट्रस्ट नॅशनल हेरॉल्ड नावाचा इंग्रजी आणि कौमी आवाज नावाचा उर्दू पेपर चालवतो- या ट्रस्टची दिल्ली आणि उत्तर प्रदेश इथे मोठ्या प्रमाणावर जमीन आणि इतर स्थावर मालमत्ता आहे - त्यावर डोळा ठेवूनच हे डील झाल्याचा आरोप आहे- बाजार भावाने तब्बल 1600 कोटी रूपयांची ही संपत्ती आहे. -हे डील होताना कंपनी कायद्याचा कुठलाही नियम पाळला गेला नाहीये असाही स्वामी यांचा दावा आहे. आरोप दुसराअसोसिएटेड जर्नल कंपनी ताब्यात घेताना त्याचे दाखवले गेलेले अनेक शेअर होल्डर्स हे सध्या हयात नाहीतपंडित नेहरू, इंदिरा आणि फिरोझ गांधी, जी.डी.बिर्ला अजूनही शेअरहोल्डर्स विकत घेताना दाखवण्यात आलेल्या सब कंपन्यांच्या पत्त्यांवर कोणीही राहत नसल्याचं आढळलंतिसरा आरोप:26 फेब्रुवारी 2011 ला असोसिएटेड जर्नलच्या डायरेक्टर बोर्ड नं एआयसीसी म्हणजेच ऑल इंडिया काँग्रेस कमिटीकडून 90 कोटी रुपयांचं कर्ज घेण्याला मान्यता दिली राजकीय पक्षाला असं कर्ज देता येत नाही आणि पक्षाकडून घेताही येत नाही. त्यामुळे हा व्यवहार बेकायदेशीर आहे त्याचवेळी या बोर्डने राहुल आणि सोनिया गांधी मेजर शेअर होल्डर असलेल्या यंग इंडियन या कंपनीला प्रत्येकी 10 रुपयांचा एक असे 9 कोटी शेअर्स दिले. म्हणजेच 90 कोटी रूपयांचे शेअर्स दिलेचौथा आरोप:यंग इंडियन या कंपनीच्या स्टेटमेंटमधून आणखी एक गोष्ट समोर येते ती म्हणजे या कंपनीची या व्यवहारासंबंधातील बैठक 10 जनपथ या सोनिया गांधी यांच्या सरकारी निवासस्थानी झाली. सरकारी नियमानुसार सरकारी बंगल्यात अशी कोणतीही खासगी व्यवहाराबद्दलची बैठक घेता येत नाहीपाचवा आरोप :असोसिएटेड जर्नलची 90 कोटींची लायेबिलिटी यंग इंडीयन कंपनीला अवघ्या पन्नास लाख रुपयांच्या भांडवलावर मिळवता आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 1, 2012 02:17 PM IST

'नॅशनल हेराल्ड'ची मालमत्ता सोनियांनी केली खासगी'

01 नोव्हेंबर

जनता पार्टीचे अध्यक्ष सुब्रमण्यम स्वामी यांनी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर तोफ डागली. नॅशनल हेराल्ड डेली चालवणारं ट्रस्ट सोनिया आणि राहुल गांधींनी ताब्यात घेतलं. या व्यवहारात अनेक अनियमितता झाल्याचा आरोप स्वामींनी केला. असोसिएटेड जर्नल्स ताब्यात घेण्यासाठी त्यांनी यंग इंडियन ही खासगी कंपनी काढली. दिल्लीतलं 1600 कोेटींचं हेराल्ड हाऊस मिळवण्यासाठी हा व्यवहार करण्यात आला. असोसिएटेड जर्नल्समध्ये पंडित नेहरू, इंदिरा गांधी, फिरोझ गांधी हे आजही शेअरहोल्डर्स असल्याचं दाखवण्यात आलंय. असोसिएटेड जर्नल्सचं कर्ज फेडण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं 90 कोटींचं कर्ज दिलं. यंग इंडियन शेअरहोल्डरची बैठक सोनिया गांधींच्या निवासस्थानी झाली. या सर्व प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी सुब्रमण्यम स्वामी यांनी केलीय.

सुब्रम्हण्यम स्वामी यांनी नेमके या आरोप केलेत ?

पहिला आरोप:- सोनिया आणि राहुल गांधींनी यंग इंडियन नावाची खासगी कंपनी काढून असोसिएटेड जर्नल ट्रस्ट विकत घेतला - हा ट्रस्ट नॅशनल हेरॉल्ड नावाचा इंग्रजी आणि कौमी आवाज नावाचा उर्दू पेपर चालवतो- या ट्रस्टची दिल्ली आणि उत्तर प्रदेश इथे मोठ्या प्रमाणावर जमीन आणि इतर स्थावर मालमत्ता आहे - त्यावर डोळा ठेवूनच हे डील झाल्याचा आरोप आहे- बाजार भावाने तब्बल 1600 कोटी रूपयांची ही संपत्ती आहे. -हे डील होताना कंपनी कायद्याचा कुठलाही नियम पाळला गेला नाहीये असाही स्वामी यांचा दावा आहे. आरोप दुसराअसोसिएटेड जर्नल कंपनी ताब्यात घेताना त्याचे दाखवले गेलेले अनेक शेअर होल्डर्स हे सध्या हयात नाहीतपंडित नेहरू, इंदिरा आणि फिरोझ गांधी, जी.डी.बिर्ला अजूनही शेअरहोल्डर्स विकत घेताना दाखवण्यात आलेल्या सब कंपन्यांच्या पत्त्यांवर कोणीही राहत नसल्याचं आढळलं

तिसरा आरोप:26 फेब्रुवारी 2011 ला असोसिएटेड जर्नलच्या डायरेक्टर बोर्ड नं एआयसीसी म्हणजेच ऑल इंडिया काँग्रेस कमिटीकडून 90 कोटी रुपयांचं कर्ज घेण्याला मान्यता दिली राजकीय पक्षाला असं कर्ज देता येत नाही आणि पक्षाकडून घेताही येत नाही. त्यामुळे हा व्यवहार बेकायदेशीर आहे त्याचवेळी या बोर्डने राहुल आणि सोनिया गांधी मेजर शेअर होल्डर असलेल्या यंग इंडियन या कंपनीला प्रत्येकी 10 रुपयांचा एक असे 9 कोटी शेअर्स दिले. म्हणजेच 90 कोटी रूपयांचे शेअर्स दिले

चौथा आरोप:यंग इंडियन या कंपनीच्या स्टेटमेंटमधून आणखी एक गोष्ट समोर येते ती म्हणजे या कंपनीची या व्यवहारासंबंधातील बैठक 10 जनपथ या सोनिया गांधी यांच्या सरकारी निवासस्थानी झाली. सरकारी नियमानुसार सरकारी बंगल्यात अशी कोणतीही खासगी व्यवहाराबद्दलची बैठक घेता येत नाही

पाचवा आरोप :असोसिएटेड जर्नलची 90 कोटींची लायेबिलिटी यंग इंडीयन कंपनीला अवघ्या पन्नास लाख रुपयांच्या भांडवलावर मिळवता आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 1, 2012 02:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close