S M L

मध्यप्रदेशात मेधा पाटकर यांचे तुरूंगात उपोषण सुरू

06 नोव्हेंबरमेधा पाटकर आणि त्यांच्या 21 सहकार्‍यांनी मध्यप्रदेशातील छिंदवाडा तुरुंगात उपोषण सुरु केलं आहे. मध्यप्रदेशातील पेंच प्रकल्पातील पाणी वळवून अदानी पावर कंपनीला देण्याच्या विरोधात मेधा पाटकर आंदोलन करीत आहेत. अण्णा हजारे यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मेधा पाटकर यांच्या अटकेविरूद्ध त्यांनी मध्य प्रदेशभवनासमोर आंदोलन सुरू केलंय. रविवारी संध्याकाळी त्यांना पोलिसांनी अटक केली होती. काल त्यांच्या जामिनावर सुनावणी होऊ शकली नाही. दरम्यान, सरकारच्या पाणी वळवण्याच्या निर्णयामुळे 35 गावांतील 300 कुटुबीयांना फटका बसणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 6, 2012 11:32 AM IST

मध्यप्रदेशात मेधा पाटकर यांचे तुरूंगात उपोषण सुरू

06 नोव्हेंबर

मेधा पाटकर आणि त्यांच्या 21 सहकार्‍यांनी मध्यप्रदेशातील छिंदवाडा तुरुंगात उपोषण सुरु केलं आहे. मध्यप्रदेशातील पेंच प्रकल्पातील पाणी वळवून अदानी पावर कंपनीला देण्याच्या विरोधात मेधा पाटकर आंदोलन करीत आहेत. अण्णा हजारे यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मेधा पाटकर यांच्या अटकेविरूद्ध त्यांनी मध्य प्रदेशभवनासमोर आंदोलन सुरू केलंय. रविवारी संध्याकाळी त्यांना पोलिसांनी अटक केली होती. काल त्यांच्या जामिनावर सुनावणी होऊ शकली नाही. दरम्यान, सरकारच्या पाणी वळवण्याच्या निर्णयामुळे 35 गावांतील 300 कुटुबीयांना फटका बसणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 6, 2012 11:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close