S M L

भारत-पाक 'क्रिकेटयुद्धा'चे वेळापत्रक जाहीर

01 नोव्हेंबरभारत विरुद्ध पाकिस्तान मॅच म्हणजे जीवन मरणाचाच प्रश्न...रोमांचक, उत्कंठावर्धक सामने...आणि एकच जल्लोष अशा या भारत-पाक क्रिकेटयुद्धाचा भोंगा वाजलाआहे. आज बीसीसीआयनं या दौर्‍याचं वेळापत्रक जाहीर केलंय. या दौर्‍यात पाकिस्तान 3 वन डे आणि 2 टी 20 मॅच खेळणार आहे. यासाठी 22 डिसेंबरला पाकिस्तानची टीम भारतात दाखल होईल. या दौर्‍यातील पहिली टी 20 मॅच 25 डिसेंबरला बंगळुरुमध्ये तर दुसरी 27 डिसेंबरला अहमदाबादमध्ये रंगेल तर 30 डिसेंबरला चेन्नईला पहिली वन डे मॅच खेळवली जाईल. दुसरी वन डे 3 जानेवारीला कोलकात्यात, तर 6 जानेवारीला दिल्लीला तिसरी वन डे रंगेल. पाकिस्तानची टीम 7 जानेवारीला मायदेशी रवाना होईल. सध्या इंग्लंडची टीम भारत दौर्‍यावर आहे. पण ख्रिसमसच्या सुट्टीत इंग्लंड टीम मायदेशी परतणार असल्यानं या मधल्या काळात भारत-पाकिस्तान दरम्यान ही सीरिज खेळवली जाईल.असे असेल वेळापत्रक- पाकिस्तान विरुद्ध भारत - तीन वनडे आणि दोन टी 20 मॅच- 22 डिसेंबर पाक टीम दाखल- 25 डिसेंबरला - पहिली टी -20 मॅच बंगळुर- 27 डिसेंबरला - दुसरी टी -20 मॅच अहमदाबाद- 30 डिसेंबरला - पहिली वनडे मॅच चेन्नई - 3 जानेवारी - दुसरी वनडे मॅच कोलकाता- 6 जानेवारी - तिसरी वनडे मॅच दिल्ली

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 1, 2012 02:51 PM IST

भारत-पाक 'क्रिकेटयुद्धा'चे वेळापत्रक जाहीर

01 नोव्हेंबर

भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच म्हणजे जीवन मरणाचाच प्रश्न...रोमांचक, उत्कंठावर्धक सामने...आणि एकच जल्लोष अशा या भारत-पाक क्रिकेटयुद्धाचा भोंगा वाजलाआहे. आज बीसीसीआयनं या दौर्‍याचं वेळापत्रक जाहीर केलंय. या दौर्‍यात पाकिस्तान 3 वन डे आणि 2 टी 20 मॅच खेळणार आहे. यासाठी 22 डिसेंबरला पाकिस्तानची टीम भारतात दाखल होईल. या दौर्‍यातील पहिली टी 20 मॅच 25 डिसेंबरला बंगळुरुमध्ये तर दुसरी 27 डिसेंबरला अहमदाबादमध्ये रंगेल तर 30 डिसेंबरला चेन्नईला पहिली वन डे मॅच खेळवली जाईल. दुसरी वन डे 3 जानेवारीला कोलकात्यात, तर 6 जानेवारीला दिल्लीला तिसरी वन डे रंगेल. पाकिस्तानची टीम 7 जानेवारीला मायदेशी रवाना होईल. सध्या इंग्लंडची टीम भारत दौर्‍यावर आहे. पण ख्रिसमसच्या सुट्टीत इंग्लंड टीम मायदेशी परतणार असल्यानं या मधल्या काळात भारत-पाकिस्तान दरम्यान ही सीरिज खेळवली जाईल.

असे असेल वेळापत्रक- पाकिस्तान विरुद्ध भारत - तीन वनडे आणि दोन टी 20 मॅच- 22 डिसेंबर पाक टीम दाखल- 25 डिसेंबरला - पहिली टी -20 मॅच बंगळुर- 27 डिसेंबरला - दुसरी टी -20 मॅच अहमदाबाद- 30 डिसेंबरला - पहिली वनडे मॅच चेन्नई - 3 जानेवारी - दुसरी वनडे मॅच कोलकाता- 6 जानेवारी - तिसरी वनडे मॅच दिल्ली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 1, 2012 02:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close