S M L

कृपांकडे मोठ्याप्रमाणावर बेहिशेबी मालमत्ता ; SITचा अहवाल

05 नोव्हेंबरबेहिशेबी मालमत्ताप्रकरणी कृपाशंकर सिंह आणखी अडचणीत सापडले आहे. SIT नं आपला अहवाल आज सुप्रीम कोर्टात सादर केला आहे. या अहवालात कृपांकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचं नमूद करण्यात आलंय. या प्रकरणाची पुढची सुनावणी आता 4 आठवड्यांनंतर होणार आहे. मागिल आठवड्यात क्राईम ब्रांच आणि ईडीने कृपाशंकर यांच्या भोवती कारवाईचा फास आवळला. कृपांच्या बरोबर त्यांच्या पुत्रांची चौकशी करण्यात आली होती. बेनामी संपत्ती सामाजिक कार्यकर्ते संजय तिवारी यांनी कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात याचिका दाखल केली. यात त्यांनी कृपाशंकर सिंह यांच्या बेनामी संपत्तीची माहिती दिली. तिवारी यांच्या म्हणण्यानुसार कृपाशंकर यांच्याकडे काय काय बेनामी संपत्ती आहे - रत्नागिरीत 225 एकर जमीन खरेदी- मुंबईत सांताक्रुझला ज्यूपिटर इमारतीत एक संपूर्ण मजला- सांताक्रुझमध्ये आणखी एक फ्लॅट- मुंबईत वांद्रे इथे 'सारंग' बंगला- उत्तर प्रदेशातील जौनपूर इथं मोठी संपत्ती- कृपाशंकर यांच्या नावावर दोन पॅनकार्ड

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 5, 2012 10:04 AM IST

कृपांकडे मोठ्याप्रमाणावर बेहिशेबी मालमत्ता ; SITचा अहवाल

05 नोव्हेंबर

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी कृपाशंकर सिंह आणखी अडचणीत सापडले आहे. SIT नं आपला अहवाल आज सुप्रीम कोर्टात सादर केला आहे. या अहवालात कृपांकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचं नमूद करण्यात आलंय. या प्रकरणाची पुढची सुनावणी आता 4 आठवड्यांनंतर होणार आहे. मागिल आठवड्यात क्राईम ब्रांच आणि ईडीने कृपाशंकर यांच्या भोवती कारवाईचा फास आवळला. कृपांच्या बरोबर त्यांच्या पुत्रांची चौकशी करण्यात आली होती.

बेनामी संपत्ती

सामाजिक कार्यकर्ते संजय तिवारी यांनी कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात याचिका दाखल केली. यात त्यांनी कृपाशंकर सिंह यांच्या बेनामी संपत्तीची माहिती दिली. तिवारी यांच्या म्हणण्यानुसार कृपाशंकर यांच्याकडे काय काय बेनामी संपत्ती आहे

- रत्नागिरीत 225 एकर जमीन खरेदी- मुंबईत सांताक्रुझला ज्यूपिटर इमारतीत एक संपूर्ण मजला- सांताक्रुझमध्ये आणखी एक फ्लॅट- मुंबईत वांद्रे इथे 'सारंग' बंगला- उत्तर प्रदेशातील जौनपूर इथं मोठी संपत्ती- कृपाशंकर यांच्या नावावर दोन पॅनकार्ड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 5, 2012 10:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close