S M L

स्वामींच्या आरोपांचं राहुल गांधींनी उत्तर द्यावं -जेटली

02 नोव्हेंबरकाँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधींवर जनता पार्टीचे अध्यक्ष सुब्रमण्यम स्वामींनी तोफ डागल्यानंतर आता भाजपही या वादात उतरली आहे. पक्षाचा पैसा खासगी कंपनीला कर्ज म्हणून दिला या स्वामींच्या आरोपावर सोनिया आणि राहुलनी उत्तर द्यावं अशी मागणी अरुण जेटली यांनी केलीय. सुब्रमण्यम स्वामींनी मांडलेल्या मुद्द्याला आता भाजपनं उचलून धरलंय. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अरूण जेटली यांनी याच मुद्द्यावर बोट ठेवलं. राजकीय पक्षाला मिळालेली देणगीची रक्कम व्यावसायिक कारणांसाठी कर्ज म्हणून दिली जात असेल तर काँग्रेसनं याचं उत्तर द्यायला हवं अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेसनं आतापर्यंत केवळ शब्दांचा खेळ केलाय. स्वामींनी केलेल्या आरोपांवर उत्तर दिलं नाही, असं भाजपनं म्हटलंय. काँग्रेस पक्षाचा निधी खासगी कंपनीला कर्ज म्हणून देण्यात आला. या कंपनीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे शेअर्स आहेत, असा आरोप स्वामींनी केला होता. राहुल गांधींच्या कार्यालयानं हे आरोप निराधार असल्याचं सांगत स्वामींविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा दिलाय. तर स्वामींनीच हे आरोप सिद्ध करून दाखवावेत, असं आव्हान काँग्रेसनं दिलंय. या वादावर सोनिया गांधींनी मात्र कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 2, 2012 05:14 PM IST

स्वामींच्या आरोपांचं राहुल गांधींनी उत्तर द्यावं -जेटली

02 नोव्हेंबर

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधींवर जनता पार्टीचे अध्यक्ष सुब्रमण्यम स्वामींनी तोफ डागल्यानंतर आता भाजपही या वादात उतरली आहे. पक्षाचा पैसा खासगी कंपनीला कर्ज म्हणून दिला या स्वामींच्या आरोपावर सोनिया आणि राहुलनी उत्तर द्यावं अशी मागणी अरुण जेटली यांनी केलीय.

सुब्रमण्यम स्वामींनी मांडलेल्या मुद्द्याला आता भाजपनं उचलून धरलंय. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अरूण जेटली यांनी याच मुद्द्यावर बोट ठेवलं. राजकीय पक्षाला मिळालेली देणगीची रक्कम व्यावसायिक कारणांसाठी कर्ज म्हणून दिली जात असेल तर काँग्रेसनं याचं उत्तर द्यायला हवं अशी मागणी त्यांनी केली.

काँग्रेसनं आतापर्यंत केवळ शब्दांचा खेळ केलाय. स्वामींनी केलेल्या आरोपांवर उत्तर दिलं नाही, असं भाजपनं म्हटलंय. काँग्रेस पक्षाचा निधी खासगी कंपनीला कर्ज म्हणून देण्यात आला. या कंपनीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे शेअर्स आहेत, असा आरोप स्वामींनी केला होता. राहुल गांधींच्या कार्यालयानं हे आरोप निराधार असल्याचं सांगत स्वामींविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा दिलाय. तर स्वामींनीच हे आरोप सिद्ध करून दाखवावेत, असं आव्हान काँग्रेसनं दिलंय. या वादावर सोनिया गांधींनी मात्र कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 2, 2012 05:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close