S M L

स्पॅनिश तरुणींवर बलात्कार करणार चोर अटकेत

06 नोव्हेंबरवांद्रे येथे परदेशी तरुणीवर बलात्कार प्रकरणी चोराला अटक करण्यात आली आहे. अन्वर अली अन्सारी उर्फ बादशहा अन्सारी असं या चोराचं नाव असून घटनेच्या दिवशी तो चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश केला. पण पीडित स्पॅनिश तरूणी एकटी पाहून त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर हजारो रुपयंाची चोरी केली या प्रकरणी पोलिसांनी घटनेची दखल घेत 48 तासाच्या आत चोराच्या मुसक्या आवळल्या आहे. या घटनेच्या तपासासाठी आठ पथकं बनवण्यात आली होती. पीडित तरुणींच्या सांगण्यावरून चोराचे रेखाचित्र जारी करण्यात आलं होतं. पोलिसांनी रेखाचित्रात दिसणार्‍या चोरासह 23 जणांचीही चौकशी केली. हे सर्वजण वांद्रे आणि आसपासच्या परिसरातले होते.तसेच पोलिसांनी मागील सहा महिन्यातील घरफोडी प्रकरणातील गुन्ह्याचे आरोपपत्र तपासून घरफोडी करणार्‍यांचीही चौकशी केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 6, 2012 05:12 PM IST

स्पॅनिश तरुणींवर बलात्कार करणार चोर अटकेत

06 नोव्हेंबर

वांद्रे येथे परदेशी तरुणीवर बलात्कार प्रकरणी चोराला अटक करण्यात आली आहे. अन्वर अली अन्सारी उर्फ बादशहा अन्सारी असं या चोराचं नाव असून घटनेच्या दिवशी तो चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश केला. पण पीडित स्पॅनिश तरूणी एकटी पाहून त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर हजारो रुपयंाची चोरी केली या प्रकरणी पोलिसांनी घटनेची दखल घेत 48 तासाच्या आत चोराच्या मुसक्या आवळल्या आहे. या घटनेच्या तपासासाठी आठ पथकं बनवण्यात आली होती. पीडित तरुणींच्या सांगण्यावरून चोराचे रेखाचित्र जारी करण्यात आलं होतं. पोलिसांनी रेखाचित्रात दिसणार्‍या चोरासह 23 जणांचीही चौकशी केली. हे सर्वजण वांद्रे आणि आसपासच्या परिसरातले होते.तसेच पोलिसांनी मागील सहा महिन्यातील घरफोडी प्रकरणातील गुन्ह्याचे आरोपपत्र तपासून घरफोडी करणार्‍यांचीही चौकशी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 6, 2012 05:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close