S M L

उद्धव ठाकरे उद्या अँजिओप्लास्टीसाठी लिलावतीत होणार दाखल

03 नोव्हेंबरशिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना उद्यापासून पुढचे तीन दिवस लिलावती हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टीसाठी दाखल करण्यात येणार आहे. यासाठी लिलावती हॉस्पिटलमधली 1130 नंबरची रूम राखून ठेवण्यात आली आहे. गेल्या जुलै महिन्यात उद्धव यांची अँजिओप्लास्टी झाली होती. त्यावेळी त्यांच्या रक्तवाहिन्यांमधले तीन ब्लॉकेजेस काढण्यात आले होते. जुलै महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर उद्धव यांच्यावर 20 जुलैला अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. अँजिओप्लास्टीच्या वेळी राज ठाकरे यांनी हजर राहावे अशी इच्छा बाळासाहेबांची होती त्यांच्या आदेशानुसार राज ठाकरे स्वत: हजर होते. अँजिओप्लास्टीनंतर राज यांनी स्वत: उद्धव यांनी राज यांनी आपल्या गाडीत मातोश्रीवर घेऊन गेले होते. आजारपणाच्या निमित्ताने उद्धव-राज यांनी तब्बल साडे तीन वर्षानंतर भेट झाली होती. या भेटीमुळे राजकीय वातावरणात तर्कवितर्क लढवले जात होते पण राज यांनी ही एक कौटुबिक भेट होती अशा वेळी सोबत असणं हे साहजिकच आहे असं सांगून चर्चेला फुलस्टाप लावला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 3, 2012 10:49 AM IST

उद्धव ठाकरे उद्या अँजिओप्लास्टीसाठी लिलावतीत होणार दाखल

03 नोव्हेंबर

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना उद्यापासून पुढचे तीन दिवस लिलावती हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टीसाठी दाखल करण्यात येणार आहे. यासाठी लिलावती हॉस्पिटलमधली 1130 नंबरची रूम राखून ठेवण्यात आली आहे. गेल्या जुलै महिन्यात उद्धव यांची अँजिओप्लास्टी झाली होती. त्यावेळी त्यांच्या रक्तवाहिन्यांमधले तीन ब्लॉकेजेस काढण्यात आले होते.

जुलै महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर उद्धव यांच्यावर 20 जुलैला अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. अँजिओप्लास्टीच्या वेळी राज ठाकरे यांनी हजर राहावे अशी इच्छा बाळासाहेबांची होती त्यांच्या आदेशानुसार राज ठाकरे स्वत: हजर होते. अँजिओप्लास्टीनंतर राज यांनी स्वत: उद्धव यांनी राज यांनी आपल्या गाडीत मातोश्रीवर घेऊन गेले होते. आजारपणाच्या निमित्ताने उद्धव-राज यांनी तब्बल साडे तीन वर्षानंतर भेट झाली होती. या भेटीमुळे राजकीय वातावरणात तर्कवितर्क लढवले जात होते पण राज यांनी ही एक कौटुबिक भेट होती अशा वेळी सोबत असणं हे साहजिकच आहे असं सांगून चर्चेला फुलस्टाप लावला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 3, 2012 10:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close