S M L

साहेब, लवकर बरे व्हा !

16 नोव्हेंबरशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती गुरूवारी रात्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मात्र आपल्या लाडक्या महानेत्याच्या प्रकृतीची काळजी सर्व शिवसैनिकांना लागली आहे. देशभरात ठिकठिकाणी बाळासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी होमहवन,प्रार्थना केल्या जात आहे. अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहे. गेल्या 48 तासांपासून हजारो शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर ठाण मांडलं आहे. काल उशीरा रात्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. सध्या बाळासाहेबांची प्रकृती गंभीर असली तरी स्थिर आहे. बाळासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. आम्ही अजून आशा सोडली नाही. तुमच्या प्रार्थनामध्ये खूप शक्ती आहे. बाळासाहेब या आजारातून बाहेर पडतील असा विश्वास उद्धव यांनी व्यक्त केला. उद्धव यांच्या स्पष्टीकरणामुळे मातोश्रीबाहेर जमलेल्या सर्वांना दिलासा मिळाला आहे. बाळासाहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आजही 'मातोश्री'वर मान्यवरांच्या भेटीचा सिलसिला सुरू आहे. योग गुरू बाबा रामदेव, अभिनेते सुरेश आणि विवेक ओबेराय यांच्यासह अनेक मान्यवरांनी मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तज्ञ डॉक्टरांचं पथकही मातोश्रीमध्ये बाळासाहेबांच्या प्रकृतीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे. संबंधित बातम्या बाळासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा -सुभाष देसाई (व्हिडिओ) बाळासाहेबांची प्रकृती स्थिर -संजय राऊत बाळासाहेबांवर उपचार सुरू आहेत, शांतता-संयम बाळगा -उद्धव ठाकरे (व्हिडिओ) काळजी बाळासाहेबांची ! (व्हिडिओ) बाबासाहेबांनी घेतली शिवसेनाप्रमुखांची भेट (व्हिडिओ) 'बाळासाहेब हे योद्धा - अमिताभ बच्चन बाळासाहेबांच्या प्रकृतीची चिंता वाटते -लतादीदी(व्हिडिओ) सलमान खान 'मातोश्री'वर(व्हिडिओ) बाळासाहेबांच्या प्रकृतीसाठी मनसे कार्यकर्त्यांचं बाप्पाला साकडं(व्हिडिओ) 'मातोश्री'बाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त (व्हिडिओ) 'मातोश्री'बाहेर शिवसैनिकांची गर्दी (व्हिडिओ) मुंबईत शुकशुकाट ; दुकानं बंद (व्हिडिओ)

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 16, 2012 08:45 AM IST

साहेब, लवकर बरे व्हा !

16 नोव्हेंबर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती गुरूवारी रात्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मात्र आपल्या लाडक्या महानेत्याच्या प्रकृतीची काळजी सर्व शिवसैनिकांना लागली आहे. देशभरात ठिकठिकाणी बाळासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी होमहवन,प्रार्थना केल्या जात आहे. अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहे. गेल्या 48 तासांपासून हजारो शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर ठाण मांडलं आहे.

काल उशीरा रात्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. सध्या बाळासाहेबांची प्रकृती गंभीर असली तरी स्थिर आहे. बाळासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. आम्ही अजून आशा सोडली नाही. तुमच्या प्रार्थनामध्ये खूप शक्ती आहे. बाळासाहेब या आजारातून बाहेर पडतील असा विश्वास उद्धव यांनी व्यक्त केला. उद्धव यांच्या स्पष्टीकरणामुळे मातोश्रीबाहेर जमलेल्या सर्वांना दिलासा मिळाला आहे. बाळासाहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आजही 'मातोश्री'वर मान्यवरांच्या भेटीचा सिलसिला सुरू आहे. योग गुरू बाबा रामदेव, अभिनेते सुरेश आणि विवेक ओबेराय यांच्यासह अनेक मान्यवरांनी मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तज्ञ डॉक्टरांचं पथकही मातोश्रीमध्ये बाळासाहेबांच्या प्रकृतीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे.

संबंधित बातम्या

बाळासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा -सुभाष देसाई (व्हिडिओ)

बाळासाहेबांची प्रकृती स्थिर -संजय राऊत

बाळासाहेबांवर उपचार सुरू आहेत, शांतता-संयम बाळगा -उद्धव ठाकरे (व्हिडिओ)

काळजी बाळासाहेबांची ! (व्हिडिओ)

बाबासाहेबांनी घेतली शिवसेनाप्रमुखांची भेट (व्हिडिओ)

'बाळासाहेब हे योद्धा - अमिताभ बच्चन

बाळासाहेबांच्या प्रकृतीची चिंता वाटते -लतादीदी(व्हिडिओ)

सलमान खान 'मातोश्री'वर(व्हिडिओ)

बाळासाहेबांच्या प्रकृतीसाठी मनसे कार्यकर्त्यांचं बाप्पाला साकडं(व्हिडिओ)

'मातोश्री'बाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त (व्हिडिओ)

'मातोश्री'बाहेर शिवसैनिकांची गर्दी (व्हिडिओ)

मुंबईत शुकशुकाट ; दुकानं बंद (व्हिडिओ)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 16, 2012 08:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close