S M L

बाळासाहेबांचा अस्थीकलश दर्शनासाठी उद्या सेनाभवनात

19 नोव्हेंबरशिवाजीपार्कवर रविवारी संध्याकाळी बाळासाहेबांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. उद्धव ठाकरे आज सकाळी बाळासाहेबांच्या अस्थी गोळा करण्यासाठी शिवाजी पार्कवर गेले होते. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अस्थिकलश दर्शनासाठी मंगळवारी 20 नोव्हेबरला 12 वाजता शिवसेना भवनात ठेवण्यात येणार आहेत. जिल्हा पातळीवर अस्थिकलषांचं वितरणसुद्धा करण्यात येईल. . तसंच सर्व राज्यप्रमुखांकडेही हे अस्थिकलश सोपवले जातील. मुंबई- महाराष्ट्रासह देशातल्या शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयांमध्ये या अस्थीकलशांचं दर्शन 21 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबरपर्यंत करता येणार आहे. तर 23 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरेंच्या अस्थीचं विसर्जन केलं जाईल. देशातल्या सर्व प्रमुख नद्यांमध्ये अस्थी विसर्जित करण्यात येतील. हरिहरेश्‍वर, नाशिक, हरिद्वार, काशी, कन्याकुमारी आदी देशभरातील प्रमुख नद्यांमध्ये सेनाप्रमुखांच्या अस्थिचं विसर्जन केले जाणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 19, 2012 10:21 AM IST

बाळासाहेबांचा अस्थीकलश दर्शनासाठी उद्या सेनाभवनात

19 नोव्हेंबर

शिवाजीपार्कवर रविवारी संध्याकाळी बाळासाहेबांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. उद्धव ठाकरे आज सकाळी बाळासाहेबांच्या अस्थी गोळा करण्यासाठी शिवाजी पार्कवर गेले होते. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अस्थिकलश दर्शनासाठी मंगळवारी 20 नोव्हेबरला 12 वाजता शिवसेना भवनात ठेवण्यात येणार आहेत. जिल्हा पातळीवर अस्थिकलषांचं वितरणसुद्धा करण्यात येईल. . तसंच सर्व राज्यप्रमुखांकडेही हे अस्थिकलश सोपवले जातील. मुंबई- महाराष्ट्रासह देशातल्या शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयांमध्ये या अस्थीकलशांचं दर्शन 21 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबरपर्यंत करता येणार आहे. तर 23 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरेंच्या अस्थीचं विसर्जन केलं जाईल. देशातल्या सर्व प्रमुख नद्यांमध्ये अस्थी विसर्जित करण्यात येतील. हरिहरेश्‍वर, नाशिक, हरिद्वार, काशी, कन्याकुमारी आदी देशभरातील प्रमुख नद्यांमध्ये सेनाप्रमुखांच्या अस्थिचं विसर्जन केले जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2012 10:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close