S M L

मुंबई सावरली, जनजीवन पूर्वपदावर

19 नोव्हेंबरशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाची बातमी वार्‍यासारखी पसरली आणि काहीवेळातच मुंबई थांबली आणि रविवारी तर मुंबईचे रस्ते अक्षरश: ओस पडले होते. पण आज शिवसेनेतर्फे मुंबई कोणताही बंद जाहीर करण्यात आलेला नाही अशी माहिती शिवसेनेतर्फे संजय राऊत यांनी दिली. आज मुंबई पूर्वपदावर आली. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळ मार्केट आणि भाजीपाला मार्केट तसेच मॅफको मार्केट आज सुरू राहणार असल्याची माहिती आमदार नरेंद्र पाटील यांनी दिली. पण मसाला आणि दाणा मार्केट मात्र आज बंद राहणार आहे. तसंच मुंबईत झवेरी बाजारातील ज्वेलर्सनी आज दुकानं न उघडण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारचा दिवस शिवसेनेसाठी काळा दिवस ठरला. ती 'ब्रेकिंग न्यूज' येऊच नये अशी प्रार्थना सर्वजण करत होते पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. शनिवारी दुपारी साडेचार वाजता डॉ.जलील पारकर आणि शिवसेनेचे पदाधिकारी यांनी येऊन साहेब गेल्याची दुखद बातमी दिली आणि अख्खा महाराष्ट्रसह शिवसैनिकांनीवर दुखाचा डोंगर कोसळला. बाळासाहेबांच्या निधनाची बातमी वार्‍यासारखी पसरली. पटापटा दुकानं,मॉल्स, बाजारमार्केट बंद झाले. काही क्षणातच मुंबई स्तब्ध झाली. शिवसैनिकांचा तर पारवारा उरला नाही. मातोश्रीबाहेर हुंदके आणि अंश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेत शिवसैनिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. बाळासाहेब आणि शिवसैनिकांमध्ये असलेल्या अतूट नात्याचा अनुभव काल मुंबईकरांनी घेतला. बाळासाहेब गेल्याची बातमी आल्यानंतर शिवसैनिकांच्या भावनांचा उद्रेक तर होणार नाही ना, याची दबक्या आवाजत चर्चा होती पण शिवसैनिकांनी संयम आणि शांततेचं दर्शन घडवत बाळासाहेबांना श्रध्दांजली अपर्ण केली. बाळासाहेबांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी रविवारी संपूर्ण राज्यातून लाखो शिवसैनिक मुंबईत दाखल झाले. शिवसेनाभवन आणि शिवाजी पार्कवर जनसागर उसळला. शिवाजी पार्कवर तर गर्दीनं कळस गाठला. पण सर्वत्र दिसली ती शिवसैनिकांची शिस्त आणि संयम.कुठेही गडबड गोंधळ नव्हता. फक्त ओढ होती बाळासाहेबांनाचं अखेरचं दर्शन घेण्याची.. मुंबई पोलिसांनी सोडला सुटकेचा श्वासबाळासाहेबांच्या अंत्यसंसस्कारासाठी रविवारी मुंबईत उसळलेल्या जनसागराने विक्रम केला. तरीही मुंबई शांत राहिली याचं श्रेय जसं शिवसैनिकांना जातं तसचं श्रेय जातं मुंबई पोलिसांना. मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची एकच गर्दी झाली होती. हुंदके, अश्रूंनी डबडबलेले डोळे मातोश्रीकडे टक लावून होती.मातोश्री पहारा देणारे खाक्यावर्दीला माणूसही या गर्दीत स्तब्ध झाला होता. वरिष्ठ अधिकार्‍यांसह तब्बल 20 हजार पोलीस शनिवार आणि रविवारी रस्त्यावर होते. उसळलेला जनसागर, देशभरातल्या व्हीव्हीआयपींची गर्दी, सर्व सामान्य नागरिक आणि शिवसैनिकांच्या भावनांना सांभाळत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. रॅपिड ऍक्शन फोर्सचीही पोलिसांना मदत झाली. मुंबईकरांनी उत्सफुर्त बंद पाळला असला तरी सार्वजनिक वाहतूक सुरळीत सुरू असल्यानं पोलिसांचा ताण थोडा हलका झाला. मुंबईचे पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी मुलीच्या लग्नाचा स्वागत समारंभ रद्द करत पहिले कर्तव्य महत्वाचे असल्याचे दाखवून दिले.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 19, 2012 10:46 AM IST

मुंबई सावरली, जनजीवन पूर्वपदावर

19 नोव्हेंबर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाची बातमी वार्‍यासारखी पसरली आणि काहीवेळातच मुंबई थांबली आणि रविवारी तर मुंबईचे रस्ते अक्षरश: ओस पडले होते. पण आज शिवसेनेतर्फे मुंबई कोणताही बंद जाहीर करण्यात आलेला नाही अशी माहिती शिवसेनेतर्फे संजय राऊत यांनी दिली. आज मुंबई पूर्वपदावर आली. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळ मार्केट आणि भाजीपाला मार्केट तसेच मॅफको मार्केट आज सुरू राहणार असल्याची माहिती आमदार नरेंद्र पाटील यांनी दिली. पण मसाला आणि दाणा मार्केट मात्र आज बंद राहणार आहे. तसंच मुंबईत झवेरी बाजारातील ज्वेलर्सनी आज दुकानं न उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

शनिवारचा दिवस शिवसेनेसाठी काळा दिवस ठरला. ती 'ब्रेकिंग न्यूज' येऊच नये अशी प्रार्थना सर्वजण करत होते पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. शनिवारी दुपारी साडेचार वाजता डॉ.जलील पारकर आणि शिवसेनेचे पदाधिकारी यांनी येऊन साहेब गेल्याची दुखद बातमी दिली आणि अख्खा महाराष्ट्रसह शिवसैनिकांनीवर दुखाचा डोंगर कोसळला. बाळासाहेबांच्या निधनाची बातमी वार्‍यासारखी पसरली. पटापटा दुकानं,मॉल्स, बाजारमार्केट बंद झाले. काही क्षणातच मुंबई स्तब्ध झाली. शिवसैनिकांचा तर पारवारा उरला नाही. मातोश्रीबाहेर हुंदके आणि अंश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेत शिवसैनिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. बाळासाहेब आणि शिवसैनिकांमध्ये असलेल्या अतूट नात्याचा अनुभव काल मुंबईकरांनी घेतला. बाळासाहेब गेल्याची बातमी आल्यानंतर शिवसैनिकांच्या भावनांचा उद्रेक तर होणार नाही ना, याची दबक्या आवाजत चर्चा होती पण शिवसैनिकांनी संयम आणि शांततेचं दर्शन घडवत बाळासाहेबांना श्रध्दांजली अपर्ण केली. बाळासाहेबांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी रविवारी संपूर्ण राज्यातून लाखो शिवसैनिक मुंबईत दाखल झाले. शिवसेनाभवन आणि शिवाजी पार्कवर जनसागर उसळला. शिवाजी पार्कवर तर गर्दीनं कळस गाठला. पण सर्वत्र दिसली ती शिवसैनिकांची शिस्त आणि संयम.कुठेही गडबड गोंधळ नव्हता. फक्त ओढ होती बाळासाहेबांनाचं अखेरचं दर्शन घेण्याची.. मुंबई पोलिसांनी सोडला सुटकेचा श्वास

बाळासाहेबांच्या अंत्यसंसस्कारासाठी रविवारी मुंबईत उसळलेल्या जनसागराने विक्रम केला. तरीही मुंबई शांत राहिली याचं श्रेय जसं शिवसैनिकांना जातं तसचं श्रेय जातं मुंबई पोलिसांना. मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची एकच गर्दी झाली होती. हुंदके, अश्रूंनी डबडबलेले डोळे मातोश्रीकडे टक लावून होती.मातोश्री पहारा देणारे खाक्यावर्दीला माणूसही या गर्दीत स्तब्ध झाला होता. वरिष्ठ अधिकार्‍यांसह तब्बल 20 हजार पोलीस शनिवार आणि रविवारी रस्त्यावर होते. उसळलेला जनसागर, देशभरातल्या व्हीव्हीआयपींची गर्दी, सर्व सामान्य नागरिक आणि शिवसैनिकांच्या भावनांना सांभाळत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. रॅपिड ऍक्शन फोर्सचीही पोलिसांना मदत झाली. मुंबईकरांनी उत्सफुर्त बंद पाळला असला तरी सार्वजनिक वाहतूक सुरळीत सुरू असल्यानं पोलिसांचा ताण थोडा हलका झाला. मुंबईचे पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी मुलीच्या लग्नाचा स्वागत समारंभ रद्द करत पहिले कर्तव्य महत्वाचे असल्याचे दाखवून दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2012 10:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close