S M L

सपाने फुंकले निवडणुकीचे रणशिंग

16 नोव्हेंबर2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आतापासूनच वातावरण तापायला लागलं आहे. समाजवादी पक्षानं 55 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. कालच काँग्रेसनं निवडणुकीसाठीच्या समन्वय समितीच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची नियुक्ती केली. त्यानंतर समाजवादी पक्षानंही आज उचललेलं हे पाऊल महत्त्वपूर्ण मानलं जातंय. मुलायम सिंग हे मैनपूरी या मतदारसंघामधून निवडणूक लढवतील. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव या कनौज येथून निवडणूक लढवतील. तर सपाचे नेते रामगोपाल यादव यांचे पुत्र अक्षय हे फिरोजाबाद येथून निवडणूक लढवतील. विशेष म्हणजे सपाच्या या यादीत सोनिया गांधी यांच्या राय बरेली आणि राहुल गांधी यांच्या अमेठी मतदारसंघांचा समावेश नाही. दुसरीकडे आजच पंतप्रधानांनी यूपीएच्या सहकारी पक्षांना स्नेह भोजनाकरिता आमंत्रित केलंय. एकंदरीतच 2014 साली होणार्‍या निवडणुकीचं वातावरण दिल्लीत तापायला लागलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 16, 2012 05:16 PM IST

सपाने फुंकले निवडणुकीचे रणशिंग

16 नोव्हेंबर

2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आतापासूनच वातावरण तापायला लागलं आहे. समाजवादी पक्षानं 55 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. कालच काँग्रेसनं निवडणुकीसाठीच्या समन्वय समितीच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची नियुक्ती केली. त्यानंतर समाजवादी पक्षानंही आज उचललेलं हे पाऊल महत्त्वपूर्ण मानलं जातंय. मुलायम सिंग हे मैनपूरी या मतदारसंघामधून निवडणूक लढवतील. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव या कनौज येथून निवडणूक लढवतील. तर सपाचे नेते रामगोपाल यादव यांचे पुत्र अक्षय हे फिरोजाबाद येथून निवडणूक लढवतील. विशेष म्हणजे सपाच्या या यादीत सोनिया गांधी यांच्या राय बरेली आणि राहुल गांधी यांच्या अमेठी मतदारसंघांचा समावेश नाही. दुसरीकडे आजच पंतप्रधानांनी यूपीएच्या सहकारी पक्षांना स्नेह भोजनाकरिता आमंत्रित केलंय. एकंदरीतच 2014 साली होणार्‍या निवडणुकीचं वातावरण दिल्लीत तापायला लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 16, 2012 05:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close