S M L

बंदला विरोध करणार्‍या फेसबुकबहाद्दर मुलीला अटक आणि जामीन

19 नोव्हेंबरशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर कुणीही बंद पाळू नये असं आवाहन शिवसेना नेत्यांनी केलं होतं. तरीही राज्यातल्या अनेक भागात बंद पाळण्यात आला. या बंदला विरोध करणार्‍या मुलीला पोलिसांनी रविवारी अटक केली होती. तिच्यावर कलम 505 आणि 62 लावण्यात आलंय. आज कोर्टानं तिला जामीन दिला आहे. ठाण्याजवळच्या पालघरमधली ही घटना आहे. संबंधित मुलीनं फेसबुकवर या बंदविरोधात ठाकरेंसारखे लोक रोज जन्मतात आणि मरतात. मग यासाठी बंद करण्याची काय गरज आहे? अशी कमेंट केली होती. त्याला अनेकांनी लाईकही केलं. पण या कमेंटमुळे भडकलेल्या काही शिवसैनिकांनी मुलीच्या नातेवाईकाच्या हॉस्पिटलमध्ये दगडफेक केली. हॉस्पिटलमध्ये घुसून फर्निचर, उपकरणाची तोडफोड केली. यानंतर पोलिसांनी त्या मुलीलाच अटक केली. तिला आता जामीन मिळाला असला तरी या प्रकारावर प्रेस क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहून या प्रकरणी पोलिसांच्या चौकशीची मागणी केली आहे. अशी अटक करणं हे लोकशाहीच्या विरूध्द असल्याचं काटूज यांनी म्हटलं आहे. यानंतर राज्य सरकारनं कोकण विभागाचे डीआयजींना याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. याची चौकशी झाल्यानंतर डीआयजी त्यांचा रिपोर्ट गृहखात्याला सोपवतील. प्रेस काऊंसिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष जस्टीस मार्कंडेय काटजू यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात काय म्हटलं ?श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर मुंबईत पाळण्यात आलेल्या बंदला फेसबुकवरून विरोध करणार्‍या मुलीला अटक करण्यात आली.धार्मिक भावना दुखावल्याच्या कारणावरून तिला अटक केल्याचं सांगण्यात आलंय. बंदला विरोध केल्यानं धार्मिक भावना दुखावल्या, असं म्हणणं मला विचित्र वाटतं. घटनेच्या कलम 19(1)(0) ने प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलाय. आपण लोकशाही राष्ट्रात राहतो. हुकूमशाही राष्ट्रात नाही. कुठलाही दोष नसताना एखाद्याला अटक करणं, हा घटनेनुसार गुन्हा आहे. आणि म्हणूनच ही घटना खरी असेल, तर संबंधित मुलीला अटक करण्याचे आदेश देणार्‍या आणि त्याची अंमलबजावणी करणार्‍या पोलिसांना ते कितीही मोठ्या पदांवर असले तरी तत्काळ निलंबित करावं त्यांना अटक करावी, आरोपपत्र दाखल करावं आणि खटला चालवावा. तुम्ही कारवाई करण्यात अपयशी ठरलात तर ज्या घटनेची शपथ घेऊन तुम्ही मुख्यमंत्री झालात त्या घटनेत सांगितलेल्या लोकशाहीच्या मार्गानं राज्य चालवण्यात तुम्ही असमर्थ आहात, असं मी समजेन आणि तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल.- न्यायमूर्ती काटजू (अध्यक्ष, प्रेस काऊंसिल ऑफ इंडिया)महत्त्वाचे सवाल- मुलीला अटक करण्यात पोलिसांनी घाई केली का ?- बंदचा निषेध केल्यानं समाजात तेढ निर्माण होते का ?- हॉस्पिटलची तोडफोड करणार्‍यांना अटक का करण्यात आली नाही ?- एखाद्या मुद्द्याचं समर्थन किंवा विरोध करण्याचं स्वातंत्र्य आम्हाला नाही का ?

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 19, 2012 12:29 PM IST

बंदला विरोध करणार्‍या फेसबुकबहाद्दर मुलीला अटक आणि जामीन

19 नोव्हेंबर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर कुणीही बंद पाळू नये असं आवाहन शिवसेना नेत्यांनी केलं होतं. तरीही राज्यातल्या अनेक भागात बंद पाळण्यात आला. या बंदला विरोध करणार्‍या मुलीला पोलिसांनी रविवारी अटक केली होती. तिच्यावर कलम 505 आणि 62 लावण्यात आलंय. आज कोर्टानं तिला जामीन दिला आहे.

ठाण्याजवळच्या पालघरमधली ही घटना आहे. संबंधित मुलीनं फेसबुकवर या बंदविरोधात ठाकरेंसारखे लोक रोज जन्मतात आणि मरतात. मग यासाठी बंद करण्याची काय गरज आहे? अशी कमेंट केली होती. त्याला अनेकांनी लाईकही केलं. पण या कमेंटमुळे भडकलेल्या काही शिवसैनिकांनी मुलीच्या नातेवाईकाच्या हॉस्पिटलमध्ये दगडफेक केली. हॉस्पिटलमध्ये घुसून फर्निचर, उपकरणाची तोडफोड केली. यानंतर पोलिसांनी त्या मुलीलाच अटक केली. तिला आता जामीन मिळाला असला तरी या प्रकारावर प्रेस क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहून या प्रकरणी पोलिसांच्या चौकशीची मागणी केली आहे. अशी अटक करणं हे लोकशाहीच्या विरूध्द असल्याचं काटूज यांनी म्हटलं आहे. यानंतर राज्य सरकारनं कोकण विभागाचे डीआयजींना याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. याची चौकशी झाल्यानंतर डीआयजी त्यांचा रिपोर्ट गृहखात्याला सोपवतील.

प्रेस काऊंसिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष जस्टीस मार्कंडेय काटजू यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात काय म्हटलं ?

श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर मुंबईत पाळण्यात आलेल्या बंदला फेसबुकवरून विरोध करणार्‍या मुलीला अटक करण्यात आली.धार्मिक भावना दुखावल्याच्या कारणावरून तिला अटक केल्याचं सांगण्यात आलंय. बंदला विरोध केल्यानं धार्मिक भावना दुखावल्या, असं म्हणणं मला विचित्र वाटतं. घटनेच्या कलम 19(1)(0) ने प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलाय. आपण लोकशाही राष्ट्रात राहतो. हुकूमशाही राष्ट्रात नाही. कुठलाही दोष नसताना एखाद्याला अटक करणं, हा घटनेनुसार गुन्हा आहे. आणि म्हणूनच ही घटना खरी असेल, तर संबंधित मुलीला अटक करण्याचे आदेश देणार्‍या आणि त्याची अंमलबजावणी करणार्‍या पोलिसांना ते कितीही मोठ्या पदांवर असले तरी तत्काळ निलंबित करावं त्यांना अटक करावी, आरोपपत्र दाखल करावं आणि खटला चालवावा. तुम्ही कारवाई करण्यात अपयशी ठरलात तर ज्या घटनेची शपथ घेऊन तुम्ही मुख्यमंत्री झालात त्या घटनेत सांगितलेल्या लोकशाहीच्या मार्गानं राज्य चालवण्यात तुम्ही असमर्थ आहात, असं मी समजेन आणि तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल.- न्यायमूर्ती काटजू (अध्यक्ष, प्रेस काऊंसिल ऑफ इंडिया)

महत्त्वाचे सवाल- मुलीला अटक करण्यात पोलिसांनी घाई केली का ?- बंदचा निषेध केल्यानं समाजात तेढ निर्माण होते का ?- हॉस्पिटलची तोडफोड करणार्‍यांना अटक का करण्यात आली नाही ?- एखाद्या मुद्द्याचं समर्थन किंवा विरोध करण्याचं स्वातंत्र्य आम्हाला नाही का ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2012 12:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close