S M L

ठाण्यात बाळासाहेबांचा 20 फूटांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार

19 नोव्हेंबर'ठाण्याची शिवसेना, शिवसेनेचे ठाणे' असं हे समिकरण असलेल्या ठाणे शहरात महापालिकेच्या मुख्यालयासमोर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वीस फुटांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. महापालिकेच्या महासभेत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. पुतळ्यासोबतच बाळासाहेबांचं स्मारकही बांधण्यात येणार आहे. त्यात त्यांचा जीवनप्रवास, व्यंगचित्रं, फोटो आणि भाषणांचा संग्रह असेल. तसंच कोलशेत इथल्या भूखंडावर बाळासाहेब ठाकरे क्रीडा विद्यापीठही उभारण्यात येणार आहे. या कामाला चालना देऊन लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ठाणे शहर बाळासाहेबांचं आवडत शहर.. कारण शिवसेनेचा पहिला विजय हा ठाण्यात झाला होता. तेव्हापासून ठाणे शिवसेनेचं झालं आणि शिवसेना ठाण्याची. 2012 च्या महापालिका निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांनी 45 वर्षांनंतर सेंट्रल मैदानात 45 वर्षानंतर सभा घेतली होती. यावेळी बाळासाहेबांनी आपल्या भाषणाच्या शेवटी म्हणाले होते, जेंव्हा मी परत येईल तेंव्हा भगवा फडकलेला दिसला पाहिजे असा आदेश शिवसैनिकांना दिला होता. आणि ठाणेकरांनी बाळासाहेबांच्या शब्द पाळत शिवसेनेला जिंकून दिलं होतं. आपल्या या लाडक्यानेत्याला श्रद्धाजंली वाहण्यासाठी लवकरच पालिकेच्या मुख्यालयासमोर शिवसेनाप्रमुखांचा वीस फुटांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 19, 2012 03:18 PM IST

ठाण्यात बाळासाहेबांचा 20 फूटांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार

19 नोव्हेंबर

'ठाण्याची शिवसेना, शिवसेनेचे ठाणे' असं हे समिकरण असलेल्या ठाणे शहरात महापालिकेच्या मुख्यालयासमोर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वीस फुटांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. महापालिकेच्या महासभेत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. पुतळ्यासोबतच बाळासाहेबांचं स्मारकही बांधण्यात येणार आहे. त्यात त्यांचा जीवनप्रवास, व्यंगचित्रं, फोटो आणि भाषणांचा संग्रह असेल. तसंच कोलशेत इथल्या भूखंडावर बाळासाहेब ठाकरे क्रीडा विद्यापीठही उभारण्यात येणार आहे. या कामाला चालना देऊन लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ठाणे शहर बाळासाहेबांचं आवडत शहर.. कारण शिवसेनेचा पहिला विजय हा ठाण्यात झाला होता. तेव्हापासून ठाणे शिवसेनेचं झालं आणि शिवसेना ठाण्याची. 2012 च्या महापालिका निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांनी 45 वर्षांनंतर सेंट्रल मैदानात 45 वर्षानंतर सभा घेतली होती. यावेळी बाळासाहेबांनी आपल्या भाषणाच्या शेवटी म्हणाले होते, जेंव्हा मी परत येईल तेंव्हा भगवा फडकलेला दिसला पाहिजे असा आदेश शिवसैनिकांना दिला होता. आणि ठाणेकरांनी बाळासाहेबांच्या शब्द पाळत शिवसेनेला जिंकून दिलं होतं. आपल्या या लाडक्यानेत्याला श्रद्धाजंली वाहण्यासाठी लवकरच पालिकेच्या मुख्यालयासमोर शिवसेनाप्रमुखांचा वीस फुटांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2012 03:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close