S M L

'मराठवाड्याला मिळणार 9 टीएमसी पाणी'

12 नोव्हेंबरमराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे काही दिवसांपूर्वीच मराठवाड्यासाठी भंडारदरा धरणातून अडीच टीएमसी पाणी सोडण्यात आलं होतं. जुलै 2013 पर्यंत मराठवाड्याला साडेचार टीमसी पाण्याची गरज आहे. आणि त्यासाठी विविध धरणसमुहांमधून 9 टीएमसी पाणी सोडावं लागणार आहे. मुळा-प्रवरा, निळवंडे, दारणा, भीमा धरणांमधून नऊ टीएमसी पाणी सोडावं असा हा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाचं मंत्रिमंडळासमोर सादरीकरण करण्यात आलंय अशी माहिती जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आदेशानुसार भंडारदरा धरणातून मराठवाड्याला अडीच टीएमसी पाणी सोडण्यात आलं. पण मराठवाड्यापर्यंत फक्त दीड टीएमसीच पाणी मिळालं. मराठवाड्यातील मुख्य जायकवाडी धरणात पिण्यात पुरतच पाणी शिल्लक आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यातच पाण्याची भीषण टंचाई जाणवायला लागली. औरंगाबादेत अधिक पाण्याच्या मागणीसाठी शिवसेनेनं मोठं आंदोलन उभारलंय. अखेरीस जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी मराठवाड्याला 9 टीएमसी पाणी देण्याचे संकेत दिले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 22, 2012 11:17 AM IST

'मराठवाड्याला मिळणार 9 टीएमसी पाणी'

12 नोव्हेंबर

मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे काही दिवसांपूर्वीच मराठवाड्यासाठी भंडारदरा धरणातून अडीच टीएमसी पाणी सोडण्यात आलं होतं. जुलै 2013 पर्यंत मराठवाड्याला साडेचार टीमसी पाण्याची गरज आहे. आणि त्यासाठी विविध धरणसमुहांमधून 9 टीएमसी पाणी सोडावं लागणार आहे. मुळा-प्रवरा, निळवंडे, दारणा, भीमा धरणांमधून नऊ टीएमसी पाणी सोडावं असा हा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाचं मंत्रिमंडळासमोर सादरीकरण करण्यात आलंय अशी माहिती जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आदेशानुसार भंडारदरा धरणातून मराठवाड्याला अडीच टीएमसी पाणी सोडण्यात आलं. पण मराठवाड्यापर्यंत फक्त दीड टीएमसीच पाणी मिळालं. मराठवाड्यातील मुख्य जायकवाडी धरणात पिण्यात पुरतच पाणी शिल्लक आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यातच पाण्याची भीषण टंचाई जाणवायला लागली. औरंगाबादेत अधिक पाण्याच्या मागणीसाठी शिवसेनेनं मोठं आंदोलन उभारलंय. अखेरीस जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी मराठवाड्याला 9 टीएमसी पाणी देण्याचे संकेत दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 22, 2012 11:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close