S M L

कन्हैयालाल गिडवाणी यांचं निधन

27 नोव्हेंबरआदर्श सोसायटीचे प्रमोटर आणि आरोपी कन्हैयालाल गिडवाणी यांचं मुंबईत निधन झालंय. ह्रदयविकाराने त्यांचं ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये निधन झालंय. पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारीच्या जोरावर साखरेचे किरकोळ व्यापारी म्हणून कन्हैयालाल गिडवाणी उदयाला आले. 1996 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता पण त्याअगोदर गिडवाणींचा माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांच्या कुटुंबाशी संबंध आला आणि त्यांचा राजकीय आलेख उंचावत गेला. सुरुवातीला काँग्रेसमध्ये छोटीमोठी कामं करुन देणार्‍या गिडवाणींनी युतीची सत्ता येताच शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेनं त्यांना ग्राहक संरक्षण समितीचं समन्वयक पद बहाल केलं. दुसर्‍याचवर्षी म्हणजे 1997 वर्षी त्यांनी अपक्षांच्या जोरावर विधान परिषदेची निवडणूक लढवली. पण विलासरावांच्याविरोधात पराभव पत्कारावा लागला.कोण आहेत गिडवाणी ? - 1996 मध्ये शिवसेनेत प्रवेश- शिवसेनेचे ग्राहक समन्वयक- 1997 ला विधान परिषद निवडणूक लढवली- पहिल्यादांचा विलासराव देशमुखांकडून धोबीपछाड- 1998 मुंबईतून लढवली विधान परिषदेची निवडणूक- समाजवादी पक्षाचे उमेदवार हुसेन दलवाईंकडून पराभव- युतीच्या सत्तेच्या शेवटच्या काळात विधान परिषदेत वर्णी- 2006 ला शिवसेनेला 'जयमहाराष्ट्र', नारायण राणेंसोबत धरला काँग्रेसचा 'हात'- काँग्रेसकडून अन्न आणि नागरी पुरवठी समितीचं अध्यक्षपद बहाल- 2009 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचे प्रवक्ते- आदर्श सोसायटीचे प्रमोटर

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 27, 2012 11:10 AM IST

कन्हैयालाल गिडवाणी यांचं निधन

27 नोव्हेंबरआदर्श सोसायटीचे प्रमोटर आणि आरोपी कन्हैयालाल गिडवाणी यांचं मुंबईत निधन झालंय. ह्रदयविकाराने त्यांचं ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये निधन झालंय. पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारीच्या जोरावर साखरेचे किरकोळ व्यापारी म्हणून कन्हैयालाल गिडवाणी उदयाला आले. 1996 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता पण त्याअगोदर गिडवाणींचा माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांच्या कुटुंबाशी संबंध आला आणि त्यांचा राजकीय आलेख उंचावत गेला. सुरुवातीला काँग्रेसमध्ये छोटीमोठी कामं करुन देणार्‍या गिडवाणींनी युतीची सत्ता येताच शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेनं त्यांना ग्राहक संरक्षण समितीचं समन्वयक पद बहाल केलं. दुसर्‍याचवर्षी म्हणजे 1997 वर्षी त्यांनी अपक्षांच्या जोरावर विधान परिषदेची निवडणूक लढवली. पण विलासरावांच्याविरोधात पराभव पत्कारावा लागला.

कोण आहेत गिडवाणी ? - 1996 मध्ये शिवसेनेत प्रवेश- शिवसेनेचे ग्राहक समन्वयक- 1997 ला विधान परिषद निवडणूक लढवली- पहिल्यादांचा विलासराव देशमुखांकडून धोबीपछाड- 1998 मुंबईतून लढवली विधान परिषदेची निवडणूक- समाजवादी पक्षाचे उमेदवार हुसेन दलवाईंकडून पराभव- युतीच्या सत्तेच्या शेवटच्या काळात विधान परिषदेत वर्णी- 2006 ला शिवसेनेला 'जयमहाराष्ट्र', नारायण राणेंसोबत धरला काँग्रेसचा 'हात'- काँग्रेसकडून अन्न आणि नागरी पुरवठी समितीचं अध्यक्षपद बहाल- 2009 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचे प्रवक्ते- आदर्श सोसायटीचे प्रमोटर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 27, 2012 11:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close