S M L

'आम आदमी'साठी पैसा झाला मोठा

27 नोव्हेंबरकेंद्र सरकारने दारिद्रय रेषेखालील लोकांना नववर्षांची एक महिना अगोदरच खास भेट दिली आहे. पुढील वर्षी 1 जानेवारीपासून दारिद्र्य रेषेखालील लोकांना थेट अनुदान मिळणार आहे. या योजनेनुसार अनुदानाची रक्कम आता थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री पी.चिंदबरम आणि ग्रामविकासमंत्री जयराम रमेश यांनी या विशेष योजनेची घोषणा केली आहे. त्यामुळे 10 कोटी गरीब कुटुंबांना याचा मोठा फायदा होणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 51 जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. ही योजना 1 जानेवारीपासून 51 जिल्ह्यांत लागू करण्यात येणार आहे. तर महाराष्ट्रात 5 जिल्ह्यांत ही योजना लागू होतं आहे. मध्यतंरी या दारिद्रय रेषेखाली लोकांना अनुदान योजनेला मोठी गळती लागली होती. गरीबांना मिळणार अनुदान मधल्यामध्येच फस्त केला जात होता. त्यामुळे सरकारने आता जुन्या अटी बाजूला सारून नव्याने योजना सुरु केली आहे.काय आहे ही योजना ?- सबसिडीऐवजी गरिबांना केंद्र सरकार थेट पैसे देणार- गरिबांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार- या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आधार कार्ड बाळगणे आवश्यक- योजनेअंतर्गत धान्य, खतं, गॅस, केरोसीन यांवर मिळणार्‍या सबसिडीचे पैसे खात्यात जमा होतील- केंद्र सरकारच्या शिक्षण, आरोग्य, राष्ट्रीय रोहयो यांसारख्या 42 योजनांचा समावेश- डिसेंबर 2013 पर्यंत संपूर्ण देशभरात ही योजना राबवली जाईल- योजनेंतर्गत दरवर्षी दहा कोटी गरीब कुटुंबांना तीन लाख 20 हजार कोटी देण्यात येतील यूपीए सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचे फायदे आणि तोटे काय आहेत ?फायदे- लाभार्थ्यांना थेट पैसे मिळणार- वितरणातल्या त्रुटी कमी होतील- निवडणुकीत यूपीएच्या फायद्याची योजनातोटे- अंमलबजावणीत अनेक अडचणी येऊ शकतात- फक्त आधारकार्ड धारकांनाच लाभ मिळणार- आधार योजनेचीच अंमलबजावणी दोषपूर्ण- आधारधारकांना बँक खाती उघडावी लागतील- लाभार्थी पैशांचं नियोजन करू शकणार नाहीत, अशी भीती

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 27, 2012 11:45 AM IST

'आम आदमी'साठी पैसा झाला मोठा

27 नोव्हेंबर

केंद्र सरकारने दारिद्रय रेषेखालील लोकांना नववर्षांची एक महिना अगोदरच खास भेट दिली आहे. पुढील वर्षी 1 जानेवारीपासून दारिद्र्य रेषेखालील लोकांना थेट अनुदान मिळणार आहे. या योजनेनुसार अनुदानाची रक्कम आता थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री पी.चिंदबरम आणि ग्रामविकासमंत्री जयराम रमेश यांनी या विशेष योजनेची घोषणा केली आहे. त्यामुळे 10 कोटी गरीब कुटुंबांना याचा मोठा फायदा होणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 51 जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. ही योजना 1 जानेवारीपासून 51 जिल्ह्यांत लागू करण्यात येणार आहे. तर महाराष्ट्रात 5 जिल्ह्यांत ही योजना लागू होतं आहे. मध्यतंरी या दारिद्रय रेषेखाली लोकांना अनुदान योजनेला मोठी गळती लागली होती. गरीबांना मिळणार अनुदान मधल्यामध्येच फस्त केला जात होता. त्यामुळे सरकारने आता जुन्या अटी बाजूला सारून नव्याने योजना सुरु केली आहे.

काय आहे ही योजना ?- सबसिडीऐवजी गरिबांना केंद्र सरकार थेट पैसे देणार- गरिबांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार- या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आधार कार्ड बाळगणे आवश्यक- योजनेअंतर्गत धान्य, खतं, गॅस, केरोसीन यांवर मिळणार्‍या सबसिडीचे पैसे खात्यात जमा होतील- केंद्र सरकारच्या शिक्षण, आरोग्य, राष्ट्रीय रोहयो यांसारख्या 42 योजनांचा समावेश- डिसेंबर 2013 पर्यंत संपूर्ण देशभरात ही योजना राबवली जाईल- योजनेंतर्गत दरवर्षी दहा कोटी गरीब कुटुंबांना तीन लाख 20 हजार कोटी देण्यात येतील

यूपीए सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचे फायदे आणि तोटे काय आहेत ?

फायदे- लाभार्थ्यांना थेट पैसे मिळणार- वितरणातल्या त्रुटी कमी होतील- निवडणुकीत यूपीएच्या फायद्याची योजना

तोटे- अंमलबजावणीत अनेक अडचणी येऊ शकतात- फक्त आधारकार्ड धारकांनाच लाभ मिळणार- आधार योजनेचीच अंमलबजावणी दोषपूर्ण- आधारधारकांना बँक खाती उघडावी लागतील- लाभार्थी पैशांचं नियोजन करू शकणार नाहीत, अशी भीती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 27, 2012 11:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close