S M L

'अजित पवारांना मंत्रिमंडळात घ्या'

29 नोव्हेंबरराष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंचन घोटाळ्यावरून होत असलेल्या आरोपामुळे तडकाफडकी राजीनामा देऊन 'दादा' आदर्श घालून दिला. मात्र आता अजितदादांना मंत्रिमंडळात पुन्हा घ्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात येतं आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आपल्या पक्षश्रेष्ठींकडे अशा आशयाची मागणी केली आहे. आज मंत्रिमंडळ बैठकीत सिंचनाची श्वेतपत्रिका सादर केली जाणार आहे. ज्या सिंचन प्रकल्पाच्या आरोपावरून अजित पवार मंत्रिमंडळातून बाहेर पडले होते त्याचं सिंचनाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा कमबॅक करण्याची चिन्ह आहे.अजित पवार यांनी 25 सप्टेंबरला तडकाफडकी अर्थखाते आणि उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन एकच धक्का दिला. अजितदादांच्या राजीनाम्यापाठोपाठ राष्ट्रवादीच्या आमदार,खासदारांनी राजीनामा प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्याकडे सुपूर्द केला. अजित पवारांनी राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तूळात एकच चर्चेला उधाण आलं होतं. काका विरुद्ध पुतण्या असा सामनाच रंगवण्यात आला पण शरद पवार यांनी सर्व शंका,कुशंकांना फुलस्टॉप लावला. शरद पवार यांनी राजीनामा नाट्याच्या तीनदिवसांनतर राष्ट्रवादींच्या मंत्र्यांची बैठक घेऊन सर्व मंत्रांवर डोळे वटारून पाहताच सर्व जण गप्प झाले. आणि अखेरीस अजित पवारांचा राजीनामा स्वीकारण्यात आला. अजितदादांच्या राजीनामानाट्यानं राज्याच्या राजकारणाला वेगळं वळणं मिळालं. पण तीन महिन्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजितदादांना परत आणण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पक्षश्रेष्ठींकडे याबद्दल मागणी केली आहे. आज संध्याकाळी श्वेतपत्रिका मंत्रिमंडळात सादर केली जाणार आहे. पण यात राज्यातल्या सर्व सिंचन प्रकल्पांची खर्चासह माहिती दिली जाणार आहे. पण सिंचन घोटाळ्यातल्या बाबींचा मात्र यात उल्लेखही नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. या सिंचन श्वेतपत्रिकेचं स्वरुप बघता ही श्वेतपत्रिका स्थितीदर्शक अहवाल म्हणजेच स्टेटस रिपोर्ट असल्याचं स्पष्ट झालंय. श्वेतपत्रिकेच्या आड राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्रिमंडळ विस्ताराची मागणी होणार आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वीच हा विस्तार व्हावा, असा आग्रह राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे करणार आहेत. तर अजित पवारांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात घेण्यासाठीच राष्ट्रवादीकडून मंत्रिमंडळ विस्ताराची मागणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता त्याच पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी अजित पवारांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याची मागणी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 29, 2012 09:55 AM IST

'अजित पवारांना मंत्रिमंडळात घ्या'

29 नोव्हेंबर

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंचन घोटाळ्यावरून होत असलेल्या आरोपामुळे तडकाफडकी राजीनामा देऊन 'दादा' आदर्श घालून दिला. मात्र आता अजितदादांना मंत्रिमंडळात पुन्हा घ्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात येतं आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आपल्या पक्षश्रेष्ठींकडे अशा आशयाची मागणी केली आहे. आज मंत्रिमंडळ बैठकीत सिंचनाची श्वेतपत्रिका सादर केली जाणार आहे. ज्या सिंचन प्रकल्पाच्या आरोपावरून अजित पवार मंत्रिमंडळातून बाहेर पडले होते त्याचं सिंचनाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा कमबॅक करण्याची चिन्ह आहे.

अजित पवार यांनी 25 सप्टेंबरला तडकाफडकी अर्थखाते आणि उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन एकच धक्का दिला. अजितदादांच्या राजीनाम्यापाठोपाठ राष्ट्रवादीच्या आमदार,खासदारांनी राजीनामा प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्याकडे सुपूर्द केला. अजित पवारांनी राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तूळात एकच चर्चेला उधाण आलं होतं. काका विरुद्ध पुतण्या असा सामनाच रंगवण्यात आला पण शरद पवार यांनी सर्व शंका,कुशंकांना फुलस्टॉप लावला. शरद पवार यांनी राजीनामा नाट्याच्या तीनदिवसांनतर राष्ट्रवादींच्या मंत्र्यांची बैठक घेऊन सर्व मंत्रांवर डोळे वटारून पाहताच सर्व जण गप्प झाले. आणि अखेरीस अजित पवारांचा राजीनामा स्वीकारण्यात आला. अजितदादांच्या राजीनामानाट्यानं राज्याच्या राजकारणाला वेगळं वळणं मिळालं. पण तीन महिन्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजितदादांना परत आणण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पक्षश्रेष्ठींकडे याबद्दल मागणी केली आहे. आज संध्याकाळी श्वेतपत्रिका मंत्रिमंडळात सादर केली जाणार आहे. पण यात राज्यातल्या सर्व सिंचन प्रकल्पांची खर्चासह माहिती दिली जाणार आहे. पण सिंचन घोटाळ्यातल्या बाबींचा मात्र यात उल्लेखही नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. या सिंचन श्वेतपत्रिकेचं स्वरुप बघता ही श्वेतपत्रिका स्थितीदर्शक अहवाल म्हणजेच स्टेटस रिपोर्ट असल्याचं स्पष्ट झालंय. श्वेतपत्रिकेच्या आड राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्रिमंडळ विस्ताराची मागणी होणार आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वीच हा विस्तार व्हावा, असा आग्रह राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे करणार आहेत. तर अजित पवारांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात घेण्यासाठीच राष्ट्रवादीकडून मंत्रिमंडळ विस्ताराची मागणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता त्याच पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी अजित पवारांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याची मागणी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 29, 2012 09:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close