S M L

उद्धव ठाकरेंच्या तंबीनंतरही संजय 'उवाच'

27 नोव्हेंबरशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाबद्दल कोणीही जाहीर वक्तव्य करू नये अशी तंबी कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी दिली होती. तरीही शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे 'उवाच' सुरुच आहे. शिवाजी पार्कवरच बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक व्हावं अशी मागणी पुन्हा एकदा संजय राऊत यांनी केली आहे. बाळासाहेबांवर जिथं अंत्यसंस्कार झाले तिथं तयार झालेलं स्मारक आणि अयोध्येतलं राममंदिर याची तुलनाही यावेळी संजय राऊत यांनी केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि दुसर्‍याच दिवशी सेना नेते मनोहर जोशी यांनी बाळासाहेबांचं स्मारक 'शिवतीर्था'वरच व्हावे अशी मागणी केली. जोशीसरांच्या मागणीनंतर सेना नगरसेवकांनीही हा मुद्दा पालिकेत उचलून धरला. तर दुसरीकडे सेनेच्या या मागणीला काही दादरवासीयांनी विरोध दर्शवला. स्मारक जोशीसंराच्या कोहीनुर मिलमध्ये उभारावे अशा सुचनाही काही जणांनी दिल्यात. स्मारकरावर सुरु झालेल्या वादावर खुद्द उद्धव ठाकरे यांनी पत्रक प्रसिद्ध करून स्मारकाबदल वाद घालू नये अशी हात जोडून विनंती केली होती. तरीही आपल्या कार्याध्यक्षाचा आदेश मोडून सेना नेते स्मारकाच्या मागणीवर व्यक्तव्य सुरुच ठेवली. खुद्द जोशी सरांनी बाळासाहेबांचं स्मारक शिवतीर्थावरच होईल अन्यथा शिवसैनिकांना कायदा हाती घ्यावा लागले असा इशाराच दिला. जोशी संराच्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही कायदा मोडून स्मारक होणार नाही असं स्पष्ट केलं. बाळासाहेबांसारखं नेतृत्वाने हरपल्यामुळे अजूनही त्या दुखातून शिवसैनिक सावरले नाही. तर दुसरीकडे स्मारकाबद्दल शब्दा-शब्दाने वाद वाढतच चालला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 27, 2012 01:55 PM IST

उद्धव ठाकरेंच्या तंबीनंतरही संजय 'उवाच'

27 नोव्हेंबर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाबद्दल कोणीही जाहीर वक्तव्य करू नये अशी तंबी कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी दिली होती. तरीही शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे 'उवाच' सुरुच आहे. शिवाजी पार्कवरच बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक व्हावं अशी मागणी पुन्हा एकदा संजय राऊत यांनी केली आहे. बाळासाहेबांवर जिथं अंत्यसंस्कार झाले तिथं तयार झालेलं स्मारक आणि अयोध्येतलं राममंदिर याची तुलनाही यावेळी संजय राऊत यांनी केली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि दुसर्‍याच दिवशी सेना नेते मनोहर जोशी यांनी बाळासाहेबांचं स्मारक 'शिवतीर्था'वरच व्हावे अशी मागणी केली. जोशीसरांच्या मागणीनंतर सेना नगरसेवकांनीही हा मुद्दा पालिकेत उचलून धरला. तर दुसरीकडे सेनेच्या या मागणीला काही दादरवासीयांनी विरोध दर्शवला. स्मारक जोशीसंराच्या कोहीनुर मिलमध्ये उभारावे अशा सुचनाही काही जणांनी दिल्यात. स्मारकरावर सुरु झालेल्या वादावर खुद्द उद्धव ठाकरे यांनी पत्रक प्रसिद्ध करून स्मारकाबदल वाद घालू नये अशी हात जोडून विनंती केली होती.

तरीही आपल्या कार्याध्यक्षाचा आदेश मोडून सेना नेते स्मारकाच्या मागणीवर व्यक्तव्य सुरुच ठेवली. खुद्द जोशी सरांनी बाळासाहेबांचं स्मारक शिवतीर्थावरच होईल अन्यथा शिवसैनिकांना कायदा हाती घ्यावा लागले असा इशाराच दिला. जोशी संराच्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही कायदा मोडून स्मारक होणार नाही असं स्पष्ट केलं. बाळासाहेबांसारखं नेतृत्वाने हरपल्यामुळे अजूनही त्या दुखातून शिवसैनिक सावरले नाही. तर दुसरीकडे स्मारकाबद्दल शब्दा-शब्दाने वाद वाढतच चालला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 27, 2012 01:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close