S M L

डॉ.विजय भटकर यांना एस.आर.जिंदल पुरस्कार जाहीर

20 नोव्हेंबरपरम महासंगणक विकसित करणारे डॉ. विजय भटकर यांना विज्ञान तंत्रज्ञान आणि पर्यावरण क्षेत्रातील योगदानाबद्दल एस. जे. फाऊंडेशनतर्फे 2012 चा 'एस. आर. जिंदल पुरस्कार' जाहीर झाला आहे. एक कोटी रुपये आणि सन्मानचिन्ह असं त्याचं स्वरुप आहे. पुढील महिन्यात दिल्लीत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. ' सी डॅक' चे संस्थापक डॉ.विजय भटकर यांनी देशातील पहिल्या सुपर कॉम्प्यूटरची निर्मिती करुन महासंगणक असलेल्या प्रगत राष्ट्रांच्या पंक्तीत देशाला नेऊन बसविले. संगणकात भारतीय भाषांता वापर करण्याबद्दलही त्यांचे योगदान महत्वाचे आहे. सध्या भटकर 'एक्सा - स्केल सुपर कॉम्प्युटिंग' प्रकल्पावर काम करत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 20, 2012 02:48 PM IST

डॉ.विजय भटकर यांना एस.आर.जिंदल पुरस्कार जाहीर

20 नोव्हेंबर

परम महासंगणक विकसित करणारे डॉ. विजय भटकर यांना विज्ञान तंत्रज्ञान आणि पर्यावरण क्षेत्रातील योगदानाबद्दल एस. जे. फाऊंडेशनतर्फे 2012 चा 'एस. आर. जिंदल पुरस्कार' जाहीर झाला आहे. एक कोटी रुपये आणि सन्मानचिन्ह असं त्याचं स्वरुप आहे. पुढील महिन्यात दिल्लीत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. ' सी डॅक' चे संस्थापक डॉ.विजय भटकर यांनी देशातील पहिल्या सुपर कॉम्प्यूटरची निर्मिती करुन महासंगणक असलेल्या प्रगत राष्ट्रांच्या पंक्तीत देशाला नेऊन बसविले. संगणकात भारतीय भाषांता वापर करण्याबद्दलही त्यांचे योगदान महत्वाचे आहे. सध्या भटकर 'एक्सा - स्केल सुपर कॉम्प्युटिंग' प्रकल्पावर काम करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 20, 2012 02:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close