S M L

'जब तक है जान'ची 6 दिवसात 120 कोटींची कमाई

20 नोव्हेंबरदिवंगत दिग्दर्शक यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट 'जब तक है जान' बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यशस्वी झालाय. या चित्रपटाने पहिल्या 6 दिवसात जगभरात मिळून जवळपास 120 कोटींचा गल्ला गोळा केलाय. विशेष म्हणजे या चित्रपटाने अमेरिकेतल्या बॉक्स ऑफिसवर टॉप टेनमध्ये स्थान पटकावलंय. तर याच चित्रपटासोबत रिलीज झालेल्या 'सन ऑफ सरदार'ने जवळपास 81 कोटींचा व्यवसाय केलाय. दिवाळीचा मुहुर्त साधून दोन्ही सिनेमे रिलीज झाले होते. या दोन्ही सिनेमाच्या निमित्ताने शाहरुख विरुद्ध अजय देवगण असा सामना रंगला होता. विशेष म्हणजेे 'जब तक है जान'ने देशात सर्वाधिक स्क्रीन बुक केल्या होत्या. त्यामुळे सन ऑफ सरदारला कमी स्क्रीन मिळाल्यात. आता बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारणार याचं चित्र अगोदरच स्पष्ट झालं होतं. पण प्रेक्षकांनी जब तक है जानला अधिक पसंती देत आठवड्याभरात भरपूर कमाई करून दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 20, 2012 04:46 PM IST

'जब तक है जान'ची 6 दिवसात 120 कोटींची कमाई

20 नोव्हेंबर

दिवंगत दिग्दर्शक यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट 'जब तक है जान' बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यशस्वी झालाय. या चित्रपटाने पहिल्या 6 दिवसात जगभरात मिळून जवळपास 120 कोटींचा गल्ला गोळा केलाय. विशेष म्हणजे या चित्रपटाने अमेरिकेतल्या बॉक्स ऑफिसवर टॉप टेनमध्ये स्थान पटकावलंय. तर याच चित्रपटासोबत रिलीज झालेल्या 'सन ऑफ सरदार'ने जवळपास 81 कोटींचा व्यवसाय केलाय. दिवाळीचा मुहुर्त साधून दोन्ही सिनेमे रिलीज झाले होते. या दोन्ही सिनेमाच्या निमित्ताने शाहरुख विरुद्ध अजय देवगण असा सामना रंगला होता. विशेष म्हणजेे 'जब तक है जान'ने देशात सर्वाधिक स्क्रीन बुक केल्या होत्या. त्यामुळे सन ऑफ सरदारला कमी स्क्रीन मिळाल्यात. आता बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारणार याचं चित्र अगोदरच स्पष्ट झालं होतं. पण प्रेक्षकांनी जब तक है जानला अधिक पसंती देत आठवड्याभरात भरपूर कमाई करून दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 20, 2012 04:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close