S M L

'नियमांनुसार स्मारक बांधता येणार नाही'

23 नोव्हेंबरशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावरून नको असलेला वाद दिवसेंदिवस शब्दाला शब्दाने वाढत आहे. मात्र या सर्व प्रकरणावर सरकारने कडक भूमिका घेतली आहे. नियमांनुसार शिवाजी पार्कवर स्मारक बांधता येणार नाही. स्मारकाचा अधिकृत प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. त्यामुळे नियमांना मोडून काहीही होणार नाही तसंच आम्हाला कुणाच्या मागणीसाठी नियम मोडण्याची इच्छाही नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण केलं. पण मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेबांचं स्मारक शिवाजी पार्कवरच होणार, असा गर्भित इशारा दिलाय.ज्या शिवाजी पार्कवर शिवसेनेचा जन्म झाला त्या शिवाजी पार्कवर 46 वर्षांनंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर रविवारी मोठ्या शोकाकुळ वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. दुसर्‍या दिवशी शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी बाळासाहेबांचं स्मारक शिवाजी पार्कवर उभारण्यात यावं अशी मागणी केली. जोशी सरांच्या या मागणीचा अधिकृत प्रस्ताव आला तर सरकार त्यावर सकारात्मक निर्णय घेईल असं नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी म्हटलं होतं. मात्र स्मारक होणार तर शिवतीर्थावर होणार अशी भुमिका शिवसेनेनं घेतली. गुरुवारी मुंबई पालिकेच्या शोकसभेत या स्मारकाच्या प्रश्नाला वेगळं वळणं मिळालं. काँग्रेसच्या नगरसेविकेनं दादर स्टेशनला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यावं अशी मागणी केली. तर मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी बाळासाहेबांचं स्मारक इंदू मिलमध्ये उभारावं अशी मागणी केली. संदीप देशपांडे यांच्या मागणीमुळे एकच खळबळ उडाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक इंदू मिलमध्ये व्हावे यासाठी गेल्या वर्षभरापासून लढा दिला जात असल्यामुळे दलित नेत्यांनी याचा कडाडून विरोध केला. संदीप देशपांडे यांचं डोकं फिरलंय त्यांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती करा आणि पक्षातून काढून टाका अशी घणाघाती टीका रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी केली. संध्याकाळी मनसेचे सरचिटणीस अनिल शिदोरे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करत संदीप देशपांडे यांना चांगलेच फटकारले. संदीप देशपांडे यांची मागणी ही व्यक्तीगत होती ती पक्षाची भूमिका नव्हती. पक्षाची भूमिका फक्त राज ठाकरे घेतात. पुतळे उभे करून स्मारकं करण्याला मनसेचा विरोध आहे. त्यापेक्षा लोकोपयोगी प्रकल्प उभारून त्यांना महापुरुषांची नावे द्यावी अशी स्पष्ट भूमिका अनिल शिदोरे यांनी एका पत्रकाद्वारे मांडली. मनसेकडून विषयावर पडदा पडला असला तरी शिवसेनेच्या नेते आपल्या मागणीवर ठाम आहे. पण मुख्यमंत्र्यांनी सरकारची कडक भूमिका घेतली आहे. आता शिवसेनेचे नेते याबद्दल काय भूमिका घेतात याकडे सगळ्याचं लक्ष लागलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 23, 2012 04:58 PM IST

'नियमांनुसार स्मारक बांधता येणार नाही'

23 नोव्हेंबर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावरून नको असलेला वाद दिवसेंदिवस शब्दाला शब्दाने वाढत आहे. मात्र या सर्व प्रकरणावर सरकारने कडक भूमिका घेतली आहे. नियमांनुसार शिवाजी पार्कवर स्मारक बांधता येणार नाही. स्मारकाचा अधिकृत प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. त्यामुळे नियमांना मोडून काहीही होणार नाही तसंच आम्हाला कुणाच्या मागणीसाठी नियम मोडण्याची इच्छाही नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण केलं. पण मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेबांचं स्मारक शिवाजी पार्कवरच होणार, असा गर्भित इशारा दिलाय.

ज्या शिवाजी पार्कवर शिवसेनेचा जन्म झाला त्या शिवाजी पार्कवर 46 वर्षांनंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर रविवारी मोठ्या शोकाकुळ वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. दुसर्‍या दिवशी शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी बाळासाहेबांचं स्मारक शिवाजी पार्कवर उभारण्यात यावं अशी मागणी केली. जोशी सरांच्या या मागणीचा अधिकृत प्रस्ताव आला तर सरकार त्यावर सकारात्मक निर्णय घेईल असं नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी म्हटलं होतं. मात्र स्मारक होणार तर शिवतीर्थावर होणार अशी भुमिका शिवसेनेनं घेतली. गुरुवारी मुंबई पालिकेच्या शोकसभेत या स्मारकाच्या प्रश्नाला वेगळं वळणं मिळालं. काँग्रेसच्या नगरसेविकेनं दादर स्टेशनला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यावं अशी मागणी केली. तर मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी बाळासाहेबांचं स्मारक इंदू मिलमध्ये उभारावं अशी मागणी केली. संदीप देशपांडे यांच्या मागणीमुळे एकच खळबळ उडाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक इंदू मिलमध्ये व्हावे यासाठी गेल्या वर्षभरापासून लढा दिला जात असल्यामुळे दलित नेत्यांनी याचा कडाडून विरोध केला. संदीप देशपांडे यांचं डोकं फिरलंय त्यांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती करा आणि पक्षातून काढून टाका अशी घणाघाती टीका रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी केली. संध्याकाळी मनसेचे सरचिटणीस अनिल शिदोरे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करत संदीप देशपांडे यांना चांगलेच फटकारले. संदीप देशपांडे यांची मागणी ही व्यक्तीगत होती ती पक्षाची भूमिका नव्हती. पक्षाची भूमिका फक्त राज ठाकरे घेतात. पुतळे उभे करून स्मारकं करण्याला मनसेचा विरोध आहे. त्यापेक्षा लोकोपयोगी प्रकल्प उभारून त्यांना महापुरुषांची नावे द्यावी अशी स्पष्ट भूमिका अनिल शिदोरे यांनी एका पत्रकाद्वारे मांडली. मनसेकडून विषयावर पडदा पडला असला तरी शिवसेनेच्या नेते आपल्या मागणीवर ठाम आहे. पण मुख्यमंत्र्यांनी सरकारची कडक भूमिका घेतली आहे. आता शिवसेनेचे नेते याबद्दल काय भूमिका घेतात याकडे सगळ्याचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 23, 2012 04:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close