S M L

नारायण राणेंनी घेतली राज ठाकरेंची सांत्वन भेट

24 नोव्हेंबरउद्योगमंत्री नारायण राणे यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर सांत्वनासाठी त्यांनी राज यांची भेट घेतल्याचं कळतंय. राणे यांनी बाळासाहेब आजार असताना त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांना परवानगी नाकारण्यात आली होती. परदेश दौर्‍यावरून परतल्यानंतर राणे यांनी मातोश्रीवर न जाता राज ठाकरेंची भेट घेतली. बाळासाहेबांना आपण भेटू शकलो नाही याची खंत त्यांनी आयबीएन लोकमतकडे बोलून दाखवली होती. बाळासाहेबांनी मला घडवलं. शिवसेना सोडली हा माझ्या आयुष्यातला दुदैर्वी निर्णय होती मी सेनेत असायला पाहिजे होतं. सेनेतून बाहेर पडल्यानंतर दोनवर्षांनंतर खुद्द बाळासाहेबांनी मला फोन करून विचारपुस केली होती एवढ्या मोठ्या मनाचा नेत्याची अखेरच्या क्षणी भेट घेता नाही आली याबद्दल मनात दुख वाटतंय अशा भावनाही राणेंनी व्यक्त केल्या होत्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 24, 2012 10:39 AM IST

नारायण राणेंनी घेतली राज ठाकरेंची सांत्वन भेट

24 नोव्हेंबर

उद्योगमंत्री नारायण राणे यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर सांत्वनासाठी त्यांनी राज यांची भेट घेतल्याचं कळतंय. राणे यांनी बाळासाहेब आजार असताना त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांना परवानगी नाकारण्यात आली होती. परदेश दौर्‍यावरून परतल्यानंतर राणे यांनी मातोश्रीवर न जाता राज ठाकरेंची भेट घेतली. बाळासाहेबांना आपण भेटू शकलो नाही याची खंत त्यांनी आयबीएन लोकमतकडे बोलून दाखवली होती. बाळासाहेबांनी मला घडवलं. शिवसेना सोडली हा माझ्या आयुष्यातला दुदैर्वी निर्णय होती मी सेनेत असायला पाहिजे होतं. सेनेतून बाहेर पडल्यानंतर दोनवर्षांनंतर खुद्द बाळासाहेबांनी मला फोन करून विचारपुस केली होती एवढ्या मोठ्या मनाचा नेत्याची अखेरच्या क्षणी भेट घेता नाही आली याबद्दल मनात दुख वाटतंय अशा भावनाही राणेंनी व्यक्त केल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 24, 2012 10:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close