S M L

मुंबईची सुरक्षा अजूनही 'रामभरोसे'

26 नोव्हेंबरमुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेच्या अनेक उपाययोजना करण्याच्या घोषणा केंद्र आणि राज्य सरकारनं केल्या. पण, सुरक्षेच्या अनेक आघाड्यांवर आपली काहीच प्रगती नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. दहशतवादाचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेल्या 11 महत्त्वाच्या बाबींमध्ये आपण अजून मागे आहोत.26 नोव्हेंबर 2008 च्या हल्ल्यात एकमेव जिवंत अतिरेकी कसाबला फाशी झाली. दहशतवादाविरोधात हा विजय असल्याचं अनेकांनी म्हटलं तर दहशतवादाविरोधातला लढा अजून संपलेला नसल्याचं काहींना वाटतं. 26/11च्या हल्ल्यानंतरही भारतीय सुरक्षा व्यवस्थेत आठ मोठ्या त्रुटी असल्याचा आरोप होतोय. - हल्ल्याच्या 7 पाकिस्तानी मास्टरमाईंडची चौकशी अतिशय धीम्या गतीनं होतेय- हल्ल्यात पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा संबंध असल्याचं सिद्ध करण्यासाठी कुठलीही हालचाल नाही- जमात-उद-दावा या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या हाफीझ सईद अजूनही मोकाटच आहे- पाकिस्तानात दहशतवाद्यांचं जाळं अजूनही फोफावतंयसंरक्षण तज्ज्ञ अजय शुक्ला म्हणतात, कसाबची फाशी म्हणजे तपास संपलेला नाही. तो फक्त एक बाहुला होता. ज्यांनी हल्ला घडवून आणला ते अजूनही पाकिस्तानात आहेत. त्यांच्याविरोधात कारवाई होईल, तेव्हाच न्याय मिळाला, असं म्हणता येईल.हल्ल्याच्या तपासाबाबत पाकिस्तानकडून फारसं सहकार्य होत नाहीय. अनेक गोष्टींचा तपास पूर्ण झालेला नाहीय.- डेव्हिड कोलमन हेडली आणि तहव्वूर राणा यांची चौकशी करण्यात अपयश आलंय- राणा आणि हेडलीला मदत करणार्‍या स्थानिक लोकांविषयी अजूनही कुठलीच माहिती भारतीय तपास संस्थांना मिळालेली नाही - हल्ल्यात हात असल्याचा आरोप असलेले दोन भारतीय सबाउद्दीन शेख आणि फहीम अंसारी याचा गुन्हा सिद्ध करण्यात यश आलं नाही- दहशतवाद विरोधी यंत्रणा आणि शहरांमध्ये आवश्यक असलेली यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचं दिसतंय. - राष्ट्रीय दहशतवादविरोधी ग्रीड अजूनही कार्यरत नाही- राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठीही कुठलीच हालचाल दिसत नाही- गुन्हा आणि संशयितांचा छडा लावणारी यंत्रणा अजून सुरूच झालेली नाही- याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरे, प्रशिक्षण आणि शस्त्रास्त्र या मूलभूत गोष्टीही अतिशय कुचकामी आहेत. राम प्रधान समितीचे सदस्य व्ही. बालचंद्रन म्हणतात, असा प्रसंग घडल्याशिवाय तो रोखण्यासाठी आपण किती सक्षम आहोत, ते कळणार नाही. पण मी केलेला तपास आणि पोलीस अधिकार्‍यांशी केलेल्या संवादातून मी हे सांगू शकतो की, अशी परिस्थिती पुन्हा उद्भवली तर आपण अधिक सक्षमपणे लढू शकतो. दुसरं म्हणजे गुप्तचर संस्थेमध्ये बरीच प्रगती दिसतेय. पण अजूनही अनेक त्रुटी आहेत. तिसरं म्हणजे सुरक्षेसंबंधी कामांमध्ये लालफीतशाही येता कामा नये. लालफीतशाही नसती तर खराब बुलेटप्रूफ जॅकेट, अपुरे सीसीटीव्ही या सारख्या समस्या उद्भवल्या नसत्या. आयपीएस अधिकारी असलेले बालचंद्रन हे 26/11 हल्ल्याच्या कारणांचा शोध घेणार्‍या तपास समितीचे सदस्य होते. त्यांच्या मते सरकारनं हा हल्ला म्हणजे केवळ मुंबईवरचा हल्ला समजण्याची चूक केली. खरं तर हा हल्ला म्हणजे देशावर झालेलं आक्रमण होतं. मला वाटतं सरकारनं या हल्ल्याला देशाच्या सुरक्षेला आव्हान मानलं नाही. त्यांनी ही मुंबई शहरापुरती मर्यादित असलेली एक छोटी घटना समजण्याची चूक केली असं परखड मत व्ही. बालचंद्रन व्यक्त केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 26, 2012 05:33 PM IST

मुंबईची सुरक्षा अजूनही 'रामभरोसे'

26 नोव्हेंबर

मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेच्या अनेक उपाययोजना करण्याच्या घोषणा केंद्र आणि राज्य सरकारनं केल्या. पण, सुरक्षेच्या अनेक आघाड्यांवर आपली काहीच प्रगती नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. दहशतवादाचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेल्या 11 महत्त्वाच्या बाबींमध्ये आपण अजून मागे आहोत.

26 नोव्हेंबर 2008 च्या हल्ल्यात एकमेव जिवंत अतिरेकी कसाबला फाशी झाली. दहशतवादाविरोधात हा विजय असल्याचं अनेकांनी म्हटलं तर दहशतवादाविरोधातला लढा अजून संपलेला नसल्याचं काहींना वाटतं. 26/11च्या हल्ल्यानंतरही भारतीय सुरक्षा व्यवस्थेत आठ मोठ्या त्रुटी असल्याचा आरोप होतोय.

- हल्ल्याच्या 7 पाकिस्तानी मास्टरमाईंडची चौकशी अतिशय धीम्या गतीनं होतेय- हल्ल्यात पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा संबंध असल्याचं सिद्ध करण्यासाठी कुठलीही हालचाल नाही- जमात-उद-दावा या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या हाफीझ सईद अजूनही मोकाटच आहे- पाकिस्तानात दहशतवाद्यांचं जाळं अजूनही फोफावतंयसंरक्षण तज्ज्ञ अजय शुक्ला म्हणतात, कसाबची फाशी म्हणजे तपास संपलेला नाही. तो फक्त एक बाहुला होता. ज्यांनी हल्ला घडवून आणला ते अजूनही पाकिस्तानात आहेत. त्यांच्याविरोधात कारवाई होईल, तेव्हाच न्याय मिळाला, असं म्हणता येईल.हल्ल्याच्या तपासाबाबत पाकिस्तानकडून फारसं सहकार्य होत नाहीय. अनेक गोष्टींचा तपास पूर्ण झालेला नाहीय.- डेव्हिड कोलमन हेडली आणि तहव्वूर राणा यांची चौकशी करण्यात अपयश आलंय- राणा आणि हेडलीला मदत करणार्‍या स्थानिक लोकांविषयी अजूनही कुठलीच माहिती भारतीय तपास संस्थांना मिळालेली नाही - हल्ल्यात हात असल्याचा आरोप असलेले दोन भारतीय सबाउद्दीन शेख आणि फहीम अंसारी याचा गुन्हा सिद्ध करण्यात यश आलं नाही- दहशतवाद विरोधी यंत्रणा आणि शहरांमध्ये आवश्यक असलेली यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचं दिसतंय. - राष्ट्रीय दहशतवादविरोधी ग्रीड अजूनही कार्यरत नाही- राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठीही कुठलीच हालचाल दिसत नाही- गुन्हा आणि संशयितांचा छडा लावणारी यंत्रणा अजून सुरूच झालेली नाही- याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरे, प्रशिक्षण आणि शस्त्रास्त्र या मूलभूत गोष्टीही अतिशय कुचकामी आहेत.

राम प्रधान समितीचे सदस्य व्ही. बालचंद्रन म्हणतात, असा प्रसंग घडल्याशिवाय तो रोखण्यासाठी आपण किती सक्षम आहोत, ते कळणार नाही. पण मी केलेला तपास आणि पोलीस अधिकार्‍यांशी केलेल्या संवादातून मी हे सांगू शकतो की, अशी परिस्थिती पुन्हा उद्भवली तर आपण अधिक सक्षमपणे लढू शकतो. दुसरं म्हणजे गुप्तचर संस्थेमध्ये बरीच प्रगती दिसतेय. पण अजूनही अनेक त्रुटी आहेत. तिसरं म्हणजे सुरक्षेसंबंधी कामांमध्ये लालफीतशाही येता कामा नये. लालफीतशाही नसती तर खराब बुलेटप्रूफ जॅकेट, अपुरे सीसीटीव्ही या सारख्या समस्या उद्भवल्या नसत्या.

आयपीएस अधिकारी असलेले बालचंद्रन हे 26/11 हल्ल्याच्या कारणांचा शोध घेणार्‍या तपास समितीचे सदस्य होते. त्यांच्या मते सरकारनं हा हल्ला म्हणजे केवळ मुंबईवरचा हल्ला समजण्याची चूक केली. खरं तर हा हल्ला म्हणजे देशावर झालेलं आक्रमण होतं. मला वाटतं सरकारनं या हल्ल्याला देशाच्या सुरक्षेला आव्हान मानलं नाही. त्यांनी ही मुंबई शहरापुरती मर्यादित असलेली एक छोटी घटना समजण्याची चूक केली असं परखड मत व्ही. बालचंद्रन व्यक्त केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 26, 2012 05:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close