S M L

ईडन गार्डन्सच्या पिचवरून रंगला वाद

28 नोव्हेंबरभारत इंग्लंड दरम्यानची तिसरी टेस्ट ही कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर रंगणार आहे. पण या टेस्टअगोदरच आता एक नवा वाद सुरु झालाय. ईडन गार्डन्सचे पीच क्युरेटर प्रबीर मुखर्जी यांनी महेंद्रसिंह धोणीला हवं असणारं फिरकीला साजेसं असं पीच तयार करण्यावर हरकत घेतली होती. त्यामुळे आता पूर्व विभागाचे क्युरेटर आशिष भौमिक हे या टेस्टसाठी ईडन गार्डन्सचं पीच बघतील. मुखर्जी यांनी धोणीच्या सांगण्यावरुन पीच तयार करण्यावर हरकत घेतली होती तसं त्यांनी काही स्थानिक पत्रकारांकडे याचा खुलासा केला होता. पण जर बीसीसीआयकडून त्यांना लेखी निर्देश जर आले तर तसं करण्यावर त्यांना आक्षेप नसल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. पण आता ही परिस्थिती लक्षात घेता पूर्व विभागाचे क्युरेटर आशिष भौमिक यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे ईडन गार्डन्सच्या क्युरेटरला डावलून विभागीय क्युरेटरला मॅचमध्ये आणण्यावरुन आता भुवया उंचावल्या जातायत. पण बंगाल क्रिकेट बोर्डानं या बातमीचं खंडन केलंय आणि मुखर्जी आणि त्यांच्यात सर्व काही आलबेल असल्याचं म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 28, 2012 01:03 PM IST

ईडन गार्डन्सच्या पिचवरून रंगला वाद

28 नोव्हेंबर

भारत इंग्लंड दरम्यानची तिसरी टेस्ट ही कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर रंगणार आहे. पण या टेस्टअगोदरच आता एक नवा वाद सुरु झालाय. ईडन गार्डन्सचे पीच क्युरेटर प्रबीर मुखर्जी यांनी महेंद्रसिंह धोणीला हवं असणारं फिरकीला साजेसं असं पीच तयार करण्यावर हरकत घेतली होती. त्यामुळे आता पूर्व विभागाचे क्युरेटर आशिष भौमिक हे या टेस्टसाठी ईडन गार्डन्सचं पीच बघतील. मुखर्जी यांनी धोणीच्या सांगण्यावरुन पीच तयार करण्यावर हरकत घेतली होती तसं त्यांनी काही स्थानिक पत्रकारांकडे याचा खुलासा केला होता. पण जर बीसीसीआयकडून त्यांना लेखी निर्देश जर आले तर तसं करण्यावर त्यांना आक्षेप नसल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. पण आता ही परिस्थिती लक्षात घेता पूर्व विभागाचे क्युरेटर आशिष भौमिक यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे ईडन गार्डन्सच्या क्युरेटरला डावलून विभागीय क्युरेटरला मॅचमध्ये आणण्यावरुन आता भुवया उंचावल्या जातायत. पण बंगाल क्रिकेट बोर्डानं या बातमीचं खंडन केलंय आणि मुखर्जी आणि त्यांच्यात सर्व काही आलबेल असल्याचं म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 28, 2012 01:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close