S M L

'स्वाभिमानी'-'आम आदमी' एकत्र

10 डिसेंबरशेतकर्‍यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आज एकाच व्यासपीठावर आलेत. सांगलीतल्या तरुण भारत स्टेडियममध्ये आम आदमी पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची संयुक्त सभा होतेय. या सभेला चांगला प्रतिसाद मिळाला. सभेच्या अगोदर भव्य रॅली काढण्यात आली होती. भ्रष्टाचाराविरोधात लढणार्‍या आम आदमी पार्टीला आमचा नेहमी पाठिंबा आहे. अण्णांच्या आंदोलनच्या वेळीही आम्ही पाठिंबा दिला. केजरीवाल यांनी आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला याचे मी स्वागत करतो आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी दोन्ही पक्षांची चर्चा होईल अशी माहिती राजू शेट्टी यांनी दिली. तर देश सध्या नाजूक परिस्थितीतून जात आहे यासाठी देशातील चांगल्या संघटनांनी एकत्र यावे असं आवाहन केजरीवाल केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 10, 2012 01:37 PM IST

'स्वाभिमानी'-'आम आदमी' एकत्र

10 डिसेंबर

शेतकर्‍यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आज एकाच व्यासपीठावर आलेत. सांगलीतल्या तरुण भारत स्टेडियममध्ये आम आदमी पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची संयुक्त सभा होतेय. या सभेला चांगला प्रतिसाद मिळाला. सभेच्या अगोदर भव्य रॅली काढण्यात आली होती. भ्रष्टाचाराविरोधात लढणार्‍या आम आदमी पार्टीला आमचा नेहमी पाठिंबा आहे. अण्णांच्या आंदोलनच्या वेळीही आम्ही पाठिंबा दिला. केजरीवाल यांनी आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला याचे मी स्वागत करतो आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी दोन्ही पक्षांची चर्चा होईल अशी माहिती राजू शेट्टी यांनी दिली. तर देश सध्या नाजूक परिस्थितीतून जात आहे यासाठी देशातील चांगल्या संघटनांनी एकत्र यावे असं आवाहन केजरीवाल केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 10, 2012 01:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close