S M L

विलासरावांचा राजीनामा मंजूर

3 नोव्हेंबर, नवी दिल्ली मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा राजीनामा अखेर स्वीकारला गेला. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सोमवारी पक्षश्रेष्ठींकडे आपला राजीनामा सोपवला होता. बुधवारपर्यंत यासंदर्भात नेमकं स्पष्टीकरण मिळत नव्हतं. त्यामुळे राजकीय तर्क-वितर्कांना वेग आला होता. मात्र अखेरीस बुधवारी रात्री विलारावांचा राजीनामा मंजूर झाल्यानं या नाट्यावर पडदा पडला.वालासरावांच्या राजीनाम्याचा प्रश्न सोमवारपासून रखडला होता मात्र बुधवारी या प्रकरणात राहुल गांधी यांनी लक्ष घातलं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय ताबडतोब घ्यावा, असं राहुल गांधी याचं म्हणणं होतं. यासंदर्भात राहुल गांधी यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री ए.के. अ‍ॅन्टोनी यांची भेट घतली. अ‍ॅन्टोनी हे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांची ही भेट विलासराव देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत होती. विलासरावांबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, कारण या घोळामुळे पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होतोय, असं राहुल गांधी यांचं म्हणणं होतं. यानंतर मुख्यमंत्रीबदलाच्या चर्चेला वेग आला आणि विलासरावांना अखेर पायउतार व्हावं लागलं.विलासरावांनंतर हे पद कोण सांभाळणार, याविषयी अद्याप कोणतंही स्पष्टीकरण मिळालं नसलं तरी उद्योगमंत्री अशोक चव्हाण आणि उर्जामंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार चर्चा आहे. मात्र शरद पवारांनी पत्रकारांशी बोलताना आजच्या घडीला मुख्यमंत्रीपद सांभाळण्यासाठी सुशीलकुमार शिंदे किंवा नारायण राणे हे योग्य उमेदवार असल्याचं म्हटलं होतं. गुरुवारी काँग्रेसच्या नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा होण्याची अटकळ बांधली जात आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 3, 2008 05:14 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 3, 2008 05:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close