S M L

भानू अथय्यांनी ऑस्कर ट्रॉफी केली परत

15 डिसेंबरभारताला पहिला ऑस्करचा मान मिळवून देणार्‍या प्रसिद्ध वेशभूषाकार भानू अथय्या यांनी अखेर ऑस्करची ट्रॉफी परत केली आहे. सुरक्षेची खात्री नसल्यानं तसंच भारतात ट्रॉफीला महत्त्व नसल्यामुळे भानू अथय्यांनी ऑस्कर ट्रॉफी परत केली. आपल्या देशात शांतिनिकेतनमधून रविंद्रनाथ टागोरांचा नोबेल पुरस्कार चोरीला जाऊ शकतो, तर आपली ट्रॉफी कितपत सुरक्षित राहील अशी भीती त्यांनी व्यक्त केली. आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी मागिल वर्षी घेतलेल्या विशेष मुलाखतीत अथय्या यांनी ही खंत बोलून दाखवली होती. अखेर त्यांनी अमेरिकेतल्या अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स अँड सायन्सकडे ऑस्कर ट्रॉफी पाठवली आहे. भारतात पहिल्यांदा ऑस्कर मिळवण्याचा मान भानू अथय्या यांना मिळाला होता. 1983 साली रिचर्ड ऍटनबरो यांच्या गांधी सिनेमासाठी त्यांनी ऑस्कर मिळाला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 15, 2012 10:23 AM IST

भानू अथय्यांनी ऑस्कर ट्रॉफी केली परत

15 डिसेंबर

भारताला पहिला ऑस्करचा मान मिळवून देणार्‍या प्रसिद्ध वेशभूषाकार भानू अथय्या यांनी अखेर ऑस्करची ट्रॉफी परत केली आहे. सुरक्षेची खात्री नसल्यानं तसंच भारतात ट्रॉफीला महत्त्व नसल्यामुळे भानू अथय्यांनी ऑस्कर ट्रॉफी परत केली. आपल्या देशात शांतिनिकेतनमधून रविंद्रनाथ टागोरांचा नोबेल पुरस्कार चोरीला जाऊ शकतो, तर आपली ट्रॉफी कितपत सुरक्षित राहील अशी भीती त्यांनी व्यक्त केली. आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी मागिल वर्षी घेतलेल्या विशेष मुलाखतीत अथय्या यांनी ही खंत बोलून दाखवली होती. अखेर त्यांनी अमेरिकेतल्या अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स अँड सायन्सकडे ऑस्कर ट्रॉफी पाठवली आहे. भारतात पहिल्यांदा ऑस्कर मिळवण्याचा मान भानू अथय्या यांना मिळाला होता. 1983 साली रिचर्ड ऍटनबरो यांच्या गांधी सिनेमासाठी त्यांनी ऑस्कर मिळाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 15, 2012 10:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close