S M L

विरोधकांना जागतिक वास्तवाचं भान नाही -पंतप्रधान

15 डिसेंबरसरकारच्या आर्थिक धोरणांना जे विरोध करतायत, त्यांना जागतिक वास्तवाचं भान नसल्याची टीका पंतप्रधांन मनमोहन सिंग यांनी केली. अडचणींचा सामना करत विकासदर 8 ते 9 टक्क्यांवर आणण्याची प्रक्रिया सुरू असून देशातलं निराशावादी वातावरण विकासातल्या मार्गातली अडचण असल्याचं मतही पंतप्रधानांनी व्यक्त केलं. आर्थिक सुधारणांसाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जोरदार पाठपुरावा केलाय. नवी दिल्लीत उद्योजकांशी बोलताना त्यांनी सरकार विकासाला चालना देण्यासाठी कठोर उपाययोजना करणार असल्याचं सांगितलं. तर लोकसभेतल्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी अशा वातावरणाला सरकारच जबाबदार असल्याचं म्हटलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 15, 2012 12:17 PM IST

विरोधकांना जागतिक वास्तवाचं भान नाही -पंतप्रधान

15 डिसेंबर

सरकारच्या आर्थिक धोरणांना जे विरोध करतायत, त्यांना जागतिक वास्तवाचं भान नसल्याची टीका पंतप्रधांन मनमोहन सिंग यांनी केली. अडचणींचा सामना करत विकासदर 8 ते 9 टक्क्यांवर आणण्याची प्रक्रिया सुरू असून देशातलं निराशावादी वातावरण विकासातल्या मार्गातली अडचण असल्याचं मतही पंतप्रधानांनी व्यक्त केलं. आर्थिक सुधारणांसाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जोरदार पाठपुरावा केलाय. नवी दिल्लीत उद्योजकांशी बोलताना त्यांनी सरकार विकासाला चालना देण्यासाठी कठोर उपाययोजना करणार असल्याचं सांगितलं. तर लोकसभेतल्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी अशा वातावरणाला सरकारच जबाबदार असल्याचं म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 15, 2012 12:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close