S M L

सिंचन घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी ?

आशिष जाधव, नागपूर 14 डिसेंबरअखेर सिंचन घोटाळ्याबाबत राज्य सरकार चौकशीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. न्यायालयीन चौकशीचा निर्णय घेण्याबाबत सरकार विचार करतंय. याबद्दल विरोधकांनी न्यायालयीन चौकशीचीही तयारी दाखवली. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या संमतीनंतर हा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार आणखी अडचणीत येवू शकतात. सिंचन घोटाळ्याची चौकशीच्या मागणीसाठी हायकोर्टात सध्या तीन याचिका दाखल आहेत. त्यामुळे न्यायालयाकडून निर्देश मिळण्याआधीच काहीतरी निर्णय घ्यावा असाही सरकारवर दबाव आहे.विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा सिंचन घोटाळ्याच्या चौकशीच्या मुद्यावर झालेल्या गदारोळामुळे वाहून गेलाय. तर आता सरकारनं या घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करण्याची तयारी केल्याचंही समजतंय. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता निर्माण झालीये. हे उलटंच झालंय...विधानभवनाच्या पायर्‍यांवर विरोधक नाहीतर चक्क सत्ताधारीच घोषणा देतायत. त्यांना सिंचन श्वेतपत्रिकेवर चर्चा हवीये. राष्ट्रवादीचे आमदार ही मागणी का करतायत यालाही काही कारणं आहेत. नेमकी कोणी आणि कोणाला सुपारी दिली यातच सर्व काही दडलंय. सिंचन घोटाळा आणि सिंचन श्वेतपत्रिकेचा मुद्दा विरोधकांनी तापवला तरच राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं नुकसान होणार आहे, हे काँग्रेसला चांगलंच ठाऊक झालंय. त्यामुळेच काँग्रेसचे नेतेही विरोधकांना हवा देतायत.आगामी निवडणुकांमध्ये जर राष्ट्रवादीला आपल्या मागं टाकायचं असेल तर सिंचन घोटाळ्याची चौकशी लावावीच लागेल असा निरोपच काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्र्यांना दिलाय. त्यामुळे सुनावणी दरम्यान हायकोर्टाने एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे निर्देश सरकारला देण्यापूर्वी आपण न्यायालयीन चौकशी लावावी अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर व्यक्त केली. म्हणूनच की काय राष्ट्रवादीचे नेते सैरभर झाले आहेत. मिस्टेक कोणतीही असो..चौकशी झालीच पाहिजे असा भाजपचा निर्धार आहे. एकूणच सध्याच्या या गोंधळाच्या स्थितीत मुख्यमंत्र्यांना पवारांशी सल्ला मसलत करुनच निर्णय घ्यावा लागणार आहे. आता शरद पवार काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचं ऐकतात की अजित पवारांच्या मागे ठामपणे उभे राहतात हे बघावं लागेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 14, 2012 05:17 PM IST

सिंचन घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी ?

आशिष जाधव, नागपूर

14 डिसेंबर

अखेर सिंचन घोटाळ्याबाबत राज्य सरकार चौकशीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. न्यायालयीन चौकशीचा निर्णय घेण्याबाबत सरकार विचार करतंय. याबद्दल विरोधकांनी न्यायालयीन चौकशीचीही तयारी दाखवली. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या संमतीनंतर हा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार आणखी अडचणीत येवू शकतात. सिंचन घोटाळ्याची चौकशीच्या मागणीसाठी हायकोर्टात सध्या तीन याचिका दाखल आहेत. त्यामुळे न्यायालयाकडून निर्देश मिळण्याआधीच काहीतरी निर्णय घ्यावा असाही सरकारवर दबाव आहे.विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा सिंचन घोटाळ्याच्या चौकशीच्या मुद्यावर झालेल्या गदारोळामुळे वाहून गेलाय. तर आता सरकारनं या घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करण्याची तयारी केल्याचंही समजतंय. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता निर्माण झालीये.

हे उलटंच झालंय...विधानभवनाच्या पायर्‍यांवर विरोधक नाहीतर चक्क सत्ताधारीच घोषणा देतायत. त्यांना सिंचन श्वेतपत्रिकेवर चर्चा हवीये. राष्ट्रवादीचे आमदार ही मागणी का करतायत यालाही काही कारणं आहेत.

नेमकी कोणी आणि कोणाला सुपारी दिली यातच सर्व काही दडलंय. सिंचन घोटाळा आणि सिंचन श्वेतपत्रिकेचा मुद्दा विरोधकांनी तापवला तरच राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं नुकसान होणार आहे, हे काँग्रेसला चांगलंच ठाऊक झालंय. त्यामुळेच काँग्रेसचे नेतेही विरोधकांना हवा देतायत.

आगामी निवडणुकांमध्ये जर राष्ट्रवादीला आपल्या मागं टाकायचं असेल तर सिंचन घोटाळ्याची चौकशी लावावीच लागेल असा निरोपच काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्र्यांना दिलाय. त्यामुळे सुनावणी दरम्यान हायकोर्टाने एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे निर्देश सरकारला देण्यापूर्वी आपण न्यायालयीन चौकशी लावावी अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर व्यक्त केली. म्हणूनच की काय राष्ट्रवादीचे नेते सैरभर झाले आहेत.

मिस्टेक कोणतीही असो..चौकशी झालीच पाहिजे असा भाजपचा निर्धार आहे. एकूणच सध्याच्या या गोंधळाच्या स्थितीत मुख्यमंत्र्यांना पवारांशी सल्ला मसलत करुनच निर्णय घ्यावा लागणार आहे. आता शरद पवार काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचं ऐकतात की अजित पवारांच्या मागे ठामपणे उभे राहतात हे बघावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 14, 2012 05:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close