S M L

असं रंगलं 'राजीनामानाट्य'

4 डिसेंबरआशिष दीक्षित तीन दिवसांच्या अनिश्चिततेनंतर अखेर मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा राजनामा काँग्रेस पक्ष प्रमुखांनी मंजूर केला. मुख्यमंत्री गुरुवारी राज्यपालांना भेटून आपला राजीनामा अधिकृतरित्या सादर करणार आहेत. अशी एका रात्रीत नेमकी कोणती राजकीय चक्र फिरली की ज्यामुळे आठ वर्ष मुख्यमंत्री असणार्‍या विलासरावांना हटवण्याचा निर्णय झाला ? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.वेळ रात्री आडेआठची... ठिकाण 10 जनपथ... प्रणव मुखर्जी, ए.के. अँटोनी आणि अहमद पटेल विलासरावांचं भविष्य ठरवायला एकत्र आले. लोकसभेच्या निवडणूका तोंडावर आल्या असताना विलासरावांसारख्या आठ वर्ष मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याला हटवायचं का ? आणि त्यांना हटवलं तर दुसरं कोणतं सर्वमान्य नाव पुढं येऊ शकेल का? अशा अनेक गहन समस्या असतानाही शेवटी विलासरावांना पदावरुन काढण्याचा निर्णय झाला. विलासराव देशमुखांचा राजीनामा काँग्रेस हायकमांडनं स्वीकारला असून नव्या मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी निरीक्षक गुरुवारी दाखल होतील असं महाराष्ट्राचे प्रभारी ए. के. अँटोनी यांनी स्पष्ट केलं.साठ तास चाललेली ही अनिश्चितता दूर करण्यात राहूल गांधीनी महत्वाची भूमिका बजावली. महाराष्ट्राचे प्रभारी ए.के.अँटोनी यांची भेट घेऊन त्यांनी गेल्या तीन दिवसातल्या घटनांबाबत नाराजी व्यक्त केलीये. अशा नाजूक प्रसंगी मुख्यमंत्री पदाबाबत घोळ घातलात तर पक्षाचं अतोनात नुकसान होईल असं राहूल गांधींनी ठणकावून सांगितलं, आणि त्यानंतर काही तासातचं मुख्यमंत्र्यांना हटवण्याचा निर्णय झाला.नाटकाचा पहिला अंक तर संपला. आता दुसर्‍या अंकात राज्याचा मुख्यमंत्री कोण ? हे ठरेल . आम्ही राष्ट्रवादीशी चर्चा केलीये असं प्रणव मुखर्जींनी सांगितलंय. त्यामुळे आता उरलीये फक्त आमदारांना एकत्र बोलवण्याची औपचारिकता. अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण की, नारायण राणे यांपैकी कोण बाजी मारणार हे लवकरचं कळेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 4, 2008 04:37 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 4, 2008 04:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close